Take a fresh look at your lifestyle.

दररोज गरम पाणी पिताय? जरा थांबा! त्या अगोदर ‘हा’ लेख वाचा, कारण गरम पाणी पिल्याने येऊ शकते मेंदूला सूज आणि..

1

आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

बऱ्याचदा आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टर आपल्याला गरम पाणी पिण्याचे सल्ले देतात. इतकेच काय तर कोरोनामुळे पूर्ण वर्षभर सर्वांनीच गरम पाणी पिले असेल. मात्र या गरम पाण्याचे आपल्या शरीरावर जेवढे फायदे आहेत तितकेच तोटे सुद्धा आहेत हे आपणास माहीत आहेत का? आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा जेवढा आपल्या आरोग्याला फायदा असतो तितक्याच पद्धतीने तितकेच पटीने तोटा सुद्धा असतो.

त्यामुळे आज आपण या लेखातून गरम पाणी पिण्याचे फायदे सोबत तोटे सुद्धा पाहणार आहोत.

चला तर मग जाणून घेऊया सर्व प्रथम गरम पाणी पिण्याचे फायदे.

१) रक्त परिसंचरण चांगले होते:– गरम पाणी शरीरात रक्ताचे प्रवाह वाढविण्यात मदत करते. सुधारित रक्त परिसंचरण अनेक आजारापासून संरक्षण करते.

२) त्वचा ग्लो करते:- गरम पाणी पिण्याने घामाच्या स्वरूपात शरीरातील घाण बाहेर येते. त्यामुळे त्वचेचे छिद्र आतून स्वच्छ होऊन पोषण मिळते. परिणामी गरम पाणी पिल्याने चेहऱ्यावरील डाग, मुरुम, सुरकुत्या काढून टाकून त्वचेवर नैसर्गिक चमक येते.

३) मासिक पाळीची वेदना कमी करते :- मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना असह्य वेदना, जळजळ, पोट दुःखी अशा सारख्या गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे जर आपण कोमट पाणी पिले तर या समस्यापासून आराम मिळतो. आणि पोट साफ होण्यास मदत होते.

४) थकवा दूर होतो :- गरम पाणी शरीराला पोषक घटक मिळवण्यात मदत करते. त्यामुळे गरम पाणी पिल्याने दिवसभराचा थकवा दूर होतो आणि शरीर आरामदायी बनवते.

५) वजन कमी करते :- गरम पाण्याचे सेवन केल्याने पोट बर्‍याच काळासाठी भरलेले राहते. यामुळे लवकर भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणास राहण्यास मदत होते.

तर हे झाले गरम पाणी पिण्याची फायदे. मात्र गरम पाणी आपल्या शरीराला जेवढा फायदे देते तेवढाच गरम पाण्याचा आपल्या शरीराला नुकसान सुद्धा होऊ शकते. म्हणूनच आता आपण गरम पाण्याचे तोटे पाहणार आहोत.

गरम पाणी पिण्याचे तोटे

१) आपल्या किडनीचे नुकसान होऊ शकते:- जास्त गरम पाणी पिण्यामुळे किडनीचे नुकसान होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल ते कसे? तर किडनी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. मात्र गरम पाणी किडनीचे हे चांगले कार्य प्रतिबंधित करते. त्यामुळे आपल्या किडनीचे जास्त गरम पाण्याचे सेवन केल्याने नुकसान होऊ शकते.

२) अंतर्गत अवयवांचे नुकसान :- जास्त प्रमाणात गरम पाणीचे सेवन केल्याने शरीराचे तापमान वाढू लागते. त्यामुळे पचन प्रणाली खराब होऊ लागते. आणि परिणामी आपल्या अंतर्गत अवयवांचे नुकसान होऊ शकते.

३) मेंदूत सूज येते :- गरम पाण्याचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने मेंदूच्या पेशींमध्ये सूज येऊ शकते. तसेच शरीरास अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.

४) तोंडात फोड येऊ शकतात :- जास्त गरम पाणी पिण्यामुळे तोंडात फोड येऊ शकतात. आपल्याला तोंडात जळजळ होण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.

तर हे होते गरम पाणी पिल्याने फायदे आणि तोटे. त्यामुळे आता तुम्हीच ठरवा दररोज गरम पाणी प्यायचे की नाही ते!

-निवास उद्धव गायकवाड

 

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

1 Comment
  1. Prajkta khandare says

    Face var glow kshyne yeto. Gor kshyni hote and clear face kshyni rahte plz 🙏 introduction me

Leave A Reply

Your email address will not be published.