Take a fresh look at your lifestyle.

शिक्षण परिषद शाळेच्या अर्धा दिवस सुट्टीच्या कालावधी आयोजित करू नका

प्रहार शिक्षक संघटनेची जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांच्याकडे मागणी

0

बुलडाणा : 
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत १०० टक्के मुले शिकण्याच्या उद्देशाने व शाळा शैक्षणिक प्रगत करण्यासाठी शासन परिपत्रकानुसार दरमहा केंद्रस्तरावर शाळेला अर्धा दिवस सुट्टी असलेल्या शनिवारी शिक्षण परिषद आयोजित करण्यात येते शनिवारी शाळेचे कामकाज करून शिक्षकांना दिवसभर शिक्षण परिषदेला उपस्थित राहावे लागते.

शनिवारला जोडून रविवारची सुट्टी असल्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्य विषयक दवाखान्याची कामे,परगावी शिकत असलेल्या मुलांच्या शैक्षणिक गरजा भागविण्याची कामे व इतर महत्त्वाची खाजगी कामे करण्यासाठी शिक्षकांना अडचण व समस्या निर्माण झालेली असल्यामुळे दरमहा शिक्षण परिषदेचे आयोजन शनिवार ऐवजी पुर्ण वेळ शाळा असलेल्या इतर कोणत्याही दिवशीच्या कालावधीत करण्यात यावे अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विजयकुमार शिंदे यांच्याकडे केली आहे.

सदर विषयानुसार प्राचार्य विजयकुमार शिंदे यांच्या चर्चा केली असता शिक्षण परिषद शनिवार ऐवजी इतर दिवशी आयोजित करण्याचे सर्व गटशिक्षणाधिकारी यांना कळविण्याचे आश्वासन याप्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विजयकुमार शिंदे दिले आहे. याप्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिक्षकांना शनिवार व रविवार जोडून सलगपणे दिड दिवसाची सुट्टी असल्यामुळे दवाखान्याची आरोग्य विषयक कामे,मुलांची शैक्षणिक कामे व इतर महत्वाची खाजगी कामे असल्यामुळे शनिवार ऐवजी इतर कोणत्याही दिवशी शिक्षण परिषद आयोजित केल्यास शिक्षकावर अन्याय होणार नाही म्हणून प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने शिक्षकावर होणारा अन्याय दुर करण्यात यावा.
– महेंद्र रोठे,
जिल्हाध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना,बुलडाणा

Leave A Reply

Your email address will not be published.