Take a fresh look at your lifestyle.

12वी पास अन् पदवीधरांना Railway मध्ये काम करण्याची संधी! असा करा अर्ज

एकूण 21 पदांसाठी ही भरती होत आहे.

0

Railway Recruitment 2022: तुम्ही जर बारावी किंवा पदवीपर्यंतच शिक्षण घेतलं असेल आणि तुम्हाला रेल्वेमध्ये काम करण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वच्या ईशान्य रेल्वे विभागामध्ये क्रीडा कोट्याअंतर्गत गट क पदांसाठी भरती करत आहेत. एकूण 21 पदांसाठी ही भरती होत आहे. पात्र उमेदवार भारतीय रेल्वेच्या ner.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. 25 एप्रिल 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतरचे अर्जांचा विचार केला जाणार नाही. (12th Pass, Graduates can apply for job in Railways)

वेतनश्रेणी:

स्तर – 2: ग्रेड पे रु 1900 आणि पे बँड रु 5200-20200

स्तर – 3: ग्रेड पे रु.2000 आणि पे बँड रु.5200-20200

स्तर – 4: ग्रेड पे रु 2400 आणि पे बँड रु. 5200-20200

स्तर – 5: ग्रेड पे रु. 28 आणि पे बँड रु.5200-20200

शैक्षणिक अर्हता:

अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून 12वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय वरिष्ठ, युवा किंवा कनिष्ठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकामध्ये स्थान प्राप्त केलेले असावे.

Leave A Reply

Your email address will not be published.