Take a fresh look at your lifestyle.

भाजपा तालुका अध्यक्षपदी भगवानराव सानप यांची निवड…

लोणार तालुका भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी भगवानराव सानप यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

0

लोणार/उध्दव नागरे

लोणार : लोणार तालुका भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी भगवानराव सानप यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजयजी कुटे, जिल्हाध्यक्ष आकाश दादा फुंडकर,आमदार श्वेता ताई महाले,माजी आमदार चैनसुख संचेती,माजी आमदार विजयराज शिंदे, महिला प्रदेश उपाध्यक्ष मंदाकिनी कंकाळ,जिल्हा सरचिटणीस संतोष बापू देशमुख,गणेश दादा मांन्टे, मोहनलाल शर्मा,माजी आमदार तोतारामजी कायंदे,प्रदेश प्रवक्ता विनोद वाघ,जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकरजी ताठे या सर्व मान्यावरनी एकमताने तालुका (मंडल)अध्यक्षपदी भगवानराव सानप यांची निवड केली.
गेली अनेक वर्ष आपण राजकीय सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्य करत आहात बुलढाणा जिल्ह्यातील पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आपण आता परिश्रम घेऊन ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पडाल असा विश्वास ठेवून भगवानराव सानप यांची मंडळ अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
भगवानराव सानप यांचा राजकीय प्रवास हा येवती गावचे सरपंच म्हणून पाच वर्ष, लोणार पंचायत समिती सभापती,लोणार कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, लोणार खरेदी विक्री महासंघ संचालक,संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष पाच वर्षे त्याचप्रमाणे त्यांच्या धर्मपत्नी सौ.मालती ताई भगवानराव सानप यांनी सुद्धा येवती गावचे सरपंच तसेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रत्येकी पाच पाच वर्ष पद भूषविली आहे.
भगवानराव सानप यांची तालुकाध्यक्षपदी निवड होताच भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये नव चैतन्य निर्माण होऊन पक्षावाढीसाठी अधिक जोमाने काम करण्यासाठी हा निर्णय प्रेरणादायी ठरलेला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.