Take a fresh look at your lifestyle.

जो बायडेन यांच्या ‘या’ गोष्टीवर एलन मस्क यांनी व्यक्त केली नाराजी; ट्विट करत दिले रोखठोक उत्तर

टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांवर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी जो बायडेन यांच्याबद्दल अनेकदा आक्रमक टिप्पण्या केल्या आहेत.

0

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्यावर निशाणा साधला आहे. बायडेन यांनी नुकतेच अमेरिकन काँग्रेसला संबोधित करताना वाहन कंपन्यांचा उल्लेख केला होता. त्यांनी म्हटले की, ‘फोर्ड (Ford) आणि जनरल मोटर्स (General Motors) यांनी इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासोबतच रोजगार वाढवण्याच्या दिशेने चांगले काम केले आहे.’ यामध्ये बायडेन यांनी टेस्ला (Tesla) या कंपनीचे नाव घेतले नाही. हीच गोष्ट एलन मस्क यांना खटकली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंबंधी ट्विटही करण्यात आले होते. यामध्ये लिहले आहे, ‘फोर्ड कंपनी इलेक्ट्रिकल वाहने बनवण्यासाठी ११ बिलियन डॉलरची गुंतवणूक करत आहे. यामुळे अमेरिकेत रोजगाराच्या ११ हजार संधी उपलब्ध होणार आहेत. याचप्रमाणे जनरल मोटर्स इलेक्ट्रिकल वाहन तयार करण्यासाठी ७ बिलियन डॉलर्स गुंतवणार आहेत. ही इतिहासातील त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक असेल. यामुळे मिशिगनमध्ये रोजगाराच्या ४ हजार संधी उपलब्ध होत आहेत.’

Leave A Reply

Your email address will not be published.