Take a fresh look at your lifestyle.

शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये समता पॅनलची विजयाकडे घोडदौड

0

शेगांव : 
शिक्षक सहकारी पतसंस्थेचे निवडणुकीचे मतदान दि.१५ मे रोजी मतदान केंद्र मुरारका महाविद्यालय येथे सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत असुन सदर निवडणुकीमध्ये समता पॅनलचे सर्व साधारण मतदार संघामध्ये अकोटकार दिपक जगन्नाथ, ढाकरे नंदकिशोर नारायण, डोसे सुरेश शांताराम, कडू रमेश रामकृष्ण, राठोड वासुदेव सुखदेव,तालोट राधाकृष्ण वासुदेव,उगले प्रशांत रामराव, झनके श्रीकांत ज्ञानदेव यांनी तर अनुसूचित जाती-जमाती मतदार संघात गवई गोवर्धन दत्तुजी यांनी भटक्या विमुक्त जाती,जमाती,विशेष मागास प्रवर्ग मतदार संघात कात्रे स्वाती प्रविण, इतर मागासवर्ग प्रवर्ग मतदार संघात गायकी गोविंद काशीनाथ, महिलाकरिता राखीव मतदार संघात धारपवार रजनी महादेव व नरवाडे विजया पांडुरंग यांनी संचालक पदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल केलेले असुन समता पॅनलच्यावतीने त्यांना उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.
शिक्षक सहकारी पतसंस्थेमध्ये संपन्न होत असलेल्या संचालक पदाकरिता संपन्न होणा-या निवडणूकीमध्ये एकाच जातीच्या जास्तीत जास्त दोन उमेदवारापेक्षा नामनिर्देशन अर्ज न स्विकारत वंचित असलेल्या जाती व अती अल्प जातीच्या व सर्व जातीच्या उमेदवारांना राजर्षी शाहू महाराज,क्रांतीसुर्य महात्मा फुले,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा घेऊन समता पॅनलच्यावतीने सर्व जातीच्या शिक्षकांना प्राधान्यक्रमाने संचालक पदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे,
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी याबाबतीत समतेची हमी दिली आहे.जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादींवर आधारित भेदभाव न करता ‘ संधीची समानता ‘ उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
संधीची समानता या आशयावर समता पॅनलने शिक्षक सहकारी पतसंस्थेमध्ये उमेदवारी दिल्यामुळे समता पॅनलचा विजय निश्चित झालेला असुन समता पॅनलची शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये संचालक पदासाठी उमेदवारांची विजयाकडे घोडदौड सुरू आहे.
समता पॅनलच्यावतीने कर्ज मर्यादा टप्प्याटप्प्याने १० लाख रूपयापर्यंत करणे,कर्ज व्याजदर कमी करणे,प्रत्येक कर्जावळी घेतला जाणारा इमारत निधी (बिल्डींग फंड) बंद करणे,मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरीचे हमीपत्र स्वीकारणे,कर्जदार सभासदाचा आकस्मिकमणे मृत्यू झाल्यास थकबाकीचे संपूर्ण कर्ज माफ करणे,निकडी (तातडी) कर्ज मर्यादा ५० हजार रूपये करणे,सर्व सभासदांना भ्रमणध्वनीवरून कर्जासंदर्भात एसएमएस सेवा पुरविणे,मृत्यु अनुदान निधी ५ लाखापर्यंत वाढविणे,पतसंस्थेचे व सभासदांसाठी करण्यात येणारे संपूर्ण आर्थिक व्यवहार भारतीय स्टेट बॅकेत करणे,सेवानिवृत्त सभासदांचा ११,००० रूपयाचा धनादेश देऊन सत्कार करणे,कन्यादान योजनेअंतर्गत सभासदांच्या मुलीच्या लग्नवेळी ११,००० रूपये सस्नेह भेट देणे,संस्थेचा कारभार पारदर्शक करणे,सभासद संख्येत वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे,लाभांश व कर्ज व्याज दर यामधे एक टक्क्यापेक्षा जास्त फरक राहणार नाही याची दक्षता घेवून लाभांश वाटप करणे,संस्था स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने निर्णय घेणे असा वचननामा घोषीत करण्यात आलेला आहे.
समता पॅनलच्या तेराही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन श्यामकुमार डाबेराव, सुनील घावट,अंनतराव वानखडे,एस.डी.पाटील,विनोद खवले,एस.बी. मसने, रवींद्र माळवे,अजाबराव पहुरकर,वर्षा अघडते,माया गणवीर, सलीम खान मिया खान, संजय सोळंके, ज्ञानदेव ताठे,उषा पाटील,संतोष बोराडे, शालिग्राम मानकर, सुभाष रावरकर, शैलेश साखरे, संजय गजाम, सुनिल तांदळे, सुनीता आडे, सुधीर बागडे, अनिल केसकर,मेघा साबळे,विनोद परतेकी, माणिकराव देशमुख, बाळु आडे, सुर्यकांत हिवराळे, शकील अहमद पीर महंमद नरेंद्र वाडेकर,राजु इंगळे,विजय टापरे,सारंगधर पिलात्रे,ओमप्रकाश इंगळे,डिंगाबर काकड,उर्मिला लांजुळकर, इंदुमती डाबेराव, वत्सला गवई,आश्विनी देशमुख,रेखा पवार व सर्व समस्त समता पॅनलचे समर्थकांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.