जिल्हा परिषद शाळा कठोरा येथे आठवीच्या मुलांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न
ईच्छापुर्तीसाठी शाळेच्यावतीने सेण्ड ऑफ कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सन गॉगल्स भेट
शेगांव :
‘छडी वाजे छमछम, विद्या येई घमघम’, असा शाळेचा प्रवास कधी संपतो हे ध्यानातच येत नाही. शाळा संपून आता विद्यालयमधील शिक्षण सुरू होणार याची चाहूल विद्यार्थ्यांना निरोप समारंभाच्या कार्यक्रमामध्ये लागत असते.विद्यार्थ्यासाठी हा सोहळा अतिशय महत्त्वाचा असतो. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या आठवणींना जसा उजाळा मिळतो, तसे पुढील करिअरसाठी ‘बेस्ट लक’ हे शब्द सुध्दा पाठबळ देऊन जातात.
जि.प.कें.व.म.प्रा.शाळा कठोरा येथील इयत्ता आठवीच्या अंतिम वर्गातून पुढील शिक्षणासाठी बाहेर पडणा-या विद्यार्थ्यांना निरोप देऊन शाळेच्यावतीने पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या,याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषणामधून शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली,पुढील शिक्षणासाठी शाळेतून बाहेर पडायचा आनंदही विद्यार्थ्यंच्या चेहऱ्यावर जाणवत होता,या सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांना करिअरची संधी, भविष्यातील शिक्षण याबद्दल शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
शालेय उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजी नगर,वेरूळ,दौलताबाद या शैक्षणिक सहली दरम्यान पर्यटन स्थळी अतिशय महागडे सन गॉगल्स असल्यामुळे सन गॉगल्स लावण्याच्या आनंद विद्यार्थी प्राप्त करू शकले नाहीत,निरोप समारंभाच्या दिवशी गोड पदार्थ शि-याच्या मेजवानीसह सहलीदरम्यान अपुर्ण राहिलेल्या ईच्छापुर्तीसाठी सन गॉगल्स विद्यार्थ्यांना भेट देण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट,शिक्षक सुरेश डोसे,संजय महाले,पुरूषोत्तम सपकाळ,सचिन वडाळ,सचिन गावंडे,अर्जुन गिरी आदींची उपस्थिती होती.
निरोप समारंभामध्ये विद्यार्थ्यांना विद्यालयीन शिक्षणासाठी शुभेच्छा देतांना उपस्थित शिक्षक वृंद