इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न
शेगांव :
पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जलंब मुले येथे शाळेच्या अंतिम वर्षाच्या इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

शाळेत वयाच्या सहाव्या वर्षी बालकाचे पहिले पाऊल पडल्यापासून ते शाळेतील अंतीम वर्गापर्यंत विद्यार्थी शिकत असतात,विद्यार्थ्यांना शाळेचा,शिक्षकांचा लळा लागलेला असतो,शिक्षक आणि विद्यार्थी असे एक अतूट नाते तयार झालेले असते,सदर नाते जोपासत वर्गशिक्षिका रजनी धारपवार यांनी विद्यार्थांना खाऊ वाटप केला व कंपास पेटी भेटवस्तू देऊन पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या तर विद्यार्थ्यांनी शाळेला भिंतीवरील घड्याळ भेटवस्तू म्हणून दिली.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक पहुरकरसर, खेडकर मॅडम व खंडेरावसर उपस्थित होते.