Take a fresh look at your lifestyle.

जिल्हयामध्ये प्रथमच प्रहारच्या उमेदवार रजनी धारपवार यांची सहकार क्षेत्रात दमदार एन्ट्री

0

शेगांव : 
पंचायत समिती प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित शेगांव र.न.९५३ च्या संचालक पदासाठी अत्यंत चुरशीच्या निवडणूकीमध्ये बहुजन विकास प्रगती पॅनलच्या सर्वच्या सर्व उमेदवाराचा पराभव करून समता पॅनलच्या तेरा पैकी तेराही उमेदवारांनी दणदणीत विजय प्राप्त केलेला आहे.
सदर निवडणुकीमध्ये समता पॅनलचे सर्व साधारण मतदार संघामध्ये अकोटकार दिपक जगन्नाथ यांनी १०० मते ढाकरे नंदकिशोर नारायण यांनी ९१ मते डोसे सुरेश शांताराम यांनी ८७ मते,कडू रमेश रामकृष्ण यांनी ९४ मते,राठोड वासुदेव सुखदेव यांनी ९४ मते,तालोट राधाकृष्ण वासुदेव यांनी ९६ मते,उगले प्रशांत रामराव यांनी ९२ मते,झनके श्रीकांत ज्ञानदेव १०९ मते प्राप्त केलेली आहेत, तर अनुसूचित जाती-जमाती मतदार संघात गवई गोवर्धन दत्तुजी यांनी ३३ मतांनी भटक्या विमुक्त जाती,जमाती,विशेष मागास प्रवर्ग मतदार संघात कात्रे स्वाती प्रविण यांनी २९ मतांनी, इतर मागासवर्ग प्रवर्ग मतदार संघात गायकी गोविंद काशीनाथ यांनी ४३ मतांनी, महिलाकरिता राखीव मतदार संघात धारपवार रजनी महादेव यांनी २९ मतांनी व नरवाडे विजया पांडुरंग यांनी २७ मतांनी प्रतिस्पर्धी बहुजन विकास प्रगती पॅनलच्या उमेदवारांचा पराभव केलेला आहे.
समता पॅनलने दणदणीत विजय प्राप्त केल्यामुळे प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल घावट यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे व पॅनल प्रमुख अंनतराव वानखडे यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय विश्राम भवन येथील सभागृहामध्ये भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करून विजयी उमेदवारांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणिस अनिल खेडकर तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष सचिन वडाळ यांनी केले,याप्रसंगी बहुसंख्येने शिक्षक उपस्थित होते.

विजयी उमेदवार रजनी धारपवार यांचा साडी चोळी,शाल,श्रीफळ देऊन सत्कार करतांना जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे व उपस्थित पदाधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.