Take a fresh look at your lifestyle.

‘‘भारताची जुनी जर्सी पुन्हा आणायची वेळ आलीय”, वसीम जाफरचा ‘आगळा-वेगळा’ सल्ला; वाचा कारण

जाफरनं एक ट्वीट केलं आहे. यात त्यानं सचिननं घातलेल्या जुन्या जर्सीचा फोटो शेअर केला आहे.

0

माजी सलामीवीर क्रिकेटपटू वसीम जाफरने भारताची ९० च्या दशकातील पिवळी जर्सी परत आणण्याची मागणी केली आहे. टीम इंडियाने भारतात आणि भारताबाहेर झालेल्या द्विपक्षीय मालिकांमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये या संघाला आयसीसीच्या स्पर्धांमध्ये जेतेपद मिळवण्यात अपयश येत आहे. यावर्षी भारतीय संघाने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना गमावल्यानंतर टी२० वर्ल्डकपमध्येही निराशा केली.

भारताला यश मिळावे यासाठी जाफरने एक आगळा-वेगळा सल्ला दिला आहे. याचे कारण म्हणजे यंदा म्हणजेच २०२१मध्ये पिवळ्या रंगाची जर्सी असलेल्या संघांचा बोलबाला राहिला आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने होते. चेन्नई सुपर किंग्ज संघाने बाजी मारली.

यानंतर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव करून पहिल्यांदाच टी-२० वर्ल्डकपचे विजेतेपद पटकावले. आता तामिळनाडूने कर्नाटकचा पराभव करून तिसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा जिंकली. चेन्नई सुपर किंग्ज, ऑस्ट्रेलिया आणि तामिळनाडू यांच्या जर्सी पिवळ्या रंगांच्या आहेत. त्यामुळे जाफरने भारताची जुनी पवळी जर्सी परत आणण्याची मागणी केली आहे.

जाफरने सोशल मीडियावर शेअर केलेला सचिन तेंडुलकरचा फोटो १९९४ च्या विल्स ट्रॉफीमधील आहे. या स्पर्धेत भारताशिवाय तत्कालीन विश्वविजेता पाकिस्तान, यजमान श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाचा संघही सहभागी झाला होता. या स्पर्धेत सचिनने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले होते. हे शतक त्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध ठोकले होते.

 


[cardoza_facebook_like_box]

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.