माजी शालेय शिक्षण मंत्री बच्चुभाऊ कडू यांचा सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप व शालेय परिसरात वृक्षारोपण
बुलडाणा :
माजी शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे व बुलडाणा जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
विद्यार्थ्यांना लेटरबुक,पेन,पेन्सिल,खोडरबर,शार्पनर,अश्या शैक्षणिक शालेय उपयोगी साहित्याचे वाटप,दीर्घायुष्यी असलेले
कडुलिंब,बदाम,पिंपळ,उबंर आदी वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले, शालेय विद्यार्थ्यांना व दिव्यांग विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून संपुर्ण जिल्हाभर लोकनायक बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
संपुर्ण जिल्हयातील
प्रहार शिक्षक संघटनेच्या पदाधिका-यांनी अतिशय उत्कृष्टपणे व उत्स्फूर्तपणे विविध सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांनी एका पत्रकान्वये अभिनंदन केले आहे.
जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम राबवून लोकनायक बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस साजरा करतांना प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी