जि.प. शाळा कठोरा येथे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती उत्साहात साजरी
वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुरक वाचनाचे विविध उपक्रम संपन्न
शेगांव :
भारताचे माजी राष्ट्रपती थोर, शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती १५ ऑक्टोबर रोजी जि.प.कें.उच्च प्राथमिक शाळा कठोरा येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकाचे पुस्तकाचे वाचन करून दाखविले,शालेय विद्यार्थ्यांना वाचन करण्यासाठी संस्कारक्षम बोधकथेचे,गोष्टीचे,महामानवाने पुस्तके वाचनासाठी वाटप करण्यात आले.
भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याची माहीती शिक्षकांनी भाषणातून सांगितली,विद्यार्थ्यांनी प्रासंगिक दिनाची माहिती भाषणातून व्यक्त केली.
याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक सुनिल घावट ,शिक्षक सुरेश डोसे,संजय महाले,सचिन वडाळ,सचिन गावंडे,अर्जुन गिरी व शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

माजी राष्ट्रपती भारतरत्न डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे पुष्प अर्पण करून पुजन करतांना शाळेतील शिक्षक वृंद