Take a fresh look at your lifestyle.

पोलिस भरतीसंदर्भात मोठी बातमी; गडचीरोलीत 416 पदं भरणार

पोलिस भरतीसंदर्भात मोठी बातमी; गडचीरोलीत 416 पदं भरणार

0

मुंबई – पोलिस भरतीसाठी इच्छुक असलेल्या तरुण, तरुणींसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गडचिरोली जिल्हा पोलिस दलातील 416 रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी गृह विभागाने मंजुरी दिली आहे. गृहखात्याकडून तसे आदेश जारी करण्यात आले आहेत. गडचिरोली पोलिस अधीक्षकांना थेट पोलिस घटक स्तरावरून ही पदे भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठं यश मिळालं आहे.

मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील पोलिस पदे रिक्त असूनही भरती प्रक्रिया सुरू केली जात नव्हती. यदरम्यान पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच जिल्ह्याचा दौरा केला आहे. यावेळी त्यांना पोलिस भरतीसाठी इच्छुक असलेल्या युवकांची बाब लक्षात आणून दिली होती. त्यांनी हा मुद्दा तातडीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निदर्शनास दिला, आणि लवकर यावर तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानुसार ही भरती होणार आहे.

या पाठपुराव्यानंतर गृह विभागाने भरती प्रक्रिया सुरू करण्याला मंजुरी दिली असून शासन आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात 150 पोलिस शिपाई, 161 पोलिस शिपाई चालक आणि 105 सशस्त्र पोलिसांची रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही पदे भरण्याची प्रक्रिया थेट पोलिस घटक स्तरावरून राबवण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.