गांधीतीर्थ पाचवे धाम,पिढीसाठी प्रेरणादायी; राज्यपाल कोश्यारी
जळगाव : महात्मा गांधींच्या स्मरणार्थ जैन हिल्स परिसरात उभारलेले गांधीतीर्थ हे भारतातील पाचवे धाम आहे, असे गौरवोद्गार काढत लहान मुली-मुले आणि तरुण पिढीसाठी हे धाम प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.

संपूर्ण जगाला गांधी विचारांची अनिवार्यता असून गांधी विचारांचे संस्कार अत्याधुनिक पद्धतीने युवा पिढीसमोर गांधी तीर्थ पोहचवित आहे. त्यांचे हे कार्य पाहून राज्यपाल भारावले. जगातील सुप्रसिद्ध अशा ऑडिओ गाईडेड म्युझियम ‘खोज गांधीजी की’ या संग्रहालयाची कोश्यारी यांनी तासभर पाहणी केली.
गांधी रिसर्च फाउंडेशनचे मुख्य समन्वयक उदय महाजन, डॉ. अश्विन झाला, नितीन चोपडा उपस्थित होते. तरुणांना गांधीजींचा आदर्श अनुभवता यावा यासाठी त्यांनी जैन हिल्स येथे गांधी रिसर्च फाउंडेशन, गांधी तीर्थाची निर्मिती केली. त्यादृष्टीने गांधी रिसर्च फाउंडेशनचे निर्मिती उद्दिष्टाचे कार्य आजदेखील प्रभावीपणे होत आहे.