Take a fresh look at your lifestyle.

जुनी पेन्शनसाठी शासकीय कर्मचा-यांनी बाईक रॅली काढत केले आंदोलन

0

शेगांव : महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी,निमशासकीय कर्मचारी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना व समन्वय समितीच्यावतीने जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी भव्य बाईक रॅलीची काढण्यात आली.बाईक रॅलीची सुरवात तहसिल कार्यालय पासुन रेल्वे स्टेशन,छत्रपती शिवाजी महाराज चौक,गांधी चौक,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,गांधी चौक,शिवनेरी चौक,भुत बंगला परिसर,सप्तश्रृंगी मंदिर,काशेलानी पेट्रोल पंप,श्री.गजानन वाटिका चौक बाईक या मार्गावरून काढण्यात आली व जुनी पेन्शन योजना लागु करण्यासंदर्भात घोषणा देऊन व निदर्शने करून आंदोलन करण्यात आले,सदर रॅलीचा समारोप तहसिल कार्यालय येथे करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यात १ नोव्हेंबर २००५ पासून शासकीय सेवेत नेमणूक झालेल्या सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना अंशदायी पेन्शन योजना लागू करत सन१९८२ची जुनी पेन्शन योजना रद्द करून शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांवर खुप मोठा अन्याय केलेला आहे म्हणून जुनी पेन्शन योजना पुर्ववत सुरू करावी अशी मागणी कर्मचारी संघटनेच्या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
शासनाने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न केल्यास मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा संघटनांच्यावतीने याप्रसंगी देण्यात आला आहे.
याप्रसंगी संजय सुरडकर,सुनिल घावट,विजय टापरे,प्रमोद इंगळे,नवल पहुरकर,रजनी धारपवार,अंनतराव वानखडे,संजय पाटील,प्रविण कात्रे,पी.जे.पवार,सावरकर ग्रामसेवक, भारत मघाडे,शेंद्रे ,शामलकर,अमोल सोळंके,मिरा कागदे,सईबाई मोटे रूग्णालयाचे,सांख्यिकीय विभागातील पदाधिका-यांनी सभेमध्ये राज्यव्यापी बेमुदत संघाचा लढा तिव्र करण्यासंदर्भात आवाहन करून मार्गदर्शन केले.

जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागु करण्यासंदर्भात बाईक रॅली काढून आंदोलन करतांना कर्मचारी

Leave A Reply

Your email address will not be published.