Take a fresh look at your lifestyle.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर

0

लोणार दि. 4 : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे दिनांक 4 व 5 फेब्रुवारी 2022 रोजी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वा सिंदखेड राजा विश्राम गृह येथे आगमन व राखीव, सकाळी 11 वा विश्रामगृह येथून राजे लखोजी जाधव राजवाड्याकडे प्रयाण, सकाळी 11.05 वा राजे लखोजी जाधव राजवाडा व मोती तलाव येथे भेट, स. 11.30 वा राजवाडा येथून लोणारकडे प्रयाण, दु. 12.20 वा एमटीडीसी विश्राम गृह, लोणार येथे आगमन व राखीव, दु. 3 वाजता एमटीडीसी विश्राम गृह येथून लोणार सरोवराकडे प्रयाण, दु. 3.05 वा लोणार सरोवर येथे आगमन व सरोवराला भेट, दु. 3.30 वा लोणार सरोवर येथून एमटीडीसी विश्राम गृहाकडे प्रयाण, दु. 3.35 वा एमटीडीसी विश्राम गृह येथे आगमन व शासकीय अधिकाऱ्यांसमवेत चर्चा, रात्री एमटीडीसी विश्राम गृह येथे मुक्काम. दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता लोणार येथून जैन मंदीर, शिरपूर जैन जि. वाशिम कडे प्रयाण करतील.

Leave A Reply

Your email address will not be published.