थोर संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त परिवर्तन पॅनलच्यावतीने अभिवादन
खामगाव :
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त परिवर्तन पॅनलच्यावतीने केंद्रप्रमुख बी.डी.धुरंधर, डाॅ.निर्मला जाधव व परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी प्रतिमेचे पुजन करून विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी जि.प.शाळचे मुख्याध्यापक,शिक्षक व परिवर्तन पॅनलचे विनायक जुमळे,एन.के.देशमुख,साहेबराव सोळंके,विजय गावंडे,राजेद्र सुरवाडे,सुर्यकांत हिवराळे,प्रशांत नागे,राजु इंगळे, विजय टापरे, सुनिल घावट,विलास मसने,आर.पी.चव्हाण,राजु सावळे,दिलीप बळी व परिवर्तन पॅनलचे आदि समर्थक उपस्थित होते.