प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त जि.प.शाळा कठोरा येथे अभिवादन
शेगांव :
आकाशवाणी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट,शिक्षक सुरेश डोसे,संजय महाले,सचिन वडाळ,सचिन गावंडे,अर्जुन गिरी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रबोधनकार ठाकरे यांनी पुरोगामित्वाचा जागर केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे ते अग्रणी होते. सामाजिक चळवळींनाही त्यांनी बळ दिले. अनिष्ट प्रथा, चालीरीतींना कडाडून विरोध केला. सुधारणांचा आग्रह धरताना लेखणी,वाणी आणि कृतीशील संदेश देणाऱ्या प्रबोधनकार ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
प्रबोधनकार ठाकरे हे सुधारणावादी विचारांचे कृतीशील नेते होते. समाजातल्या वाईट रुढी, परंपरा, जातीव्यवस्था, अस्पृश्यतेवर त्यांनी प्रहार केला. बालविवाह, केशवपन, हुंडाप्रथेसारख्या रुढींविरुद्ध प्रखर लढा दिला. ते खऱ्या अर्थानं ‘प्रबोधन’कार होते असे शाळेचे मुख्याध्यापक सुनिल घावट यांनी प्रास्ताविक भाषणातून विद्यार्थ्यांना माहिती दिली.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व शालेय विद्यार्थ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.