सेवापुर्ती निमित्त उच्चश्रेणी मुख्याध्यापक दिपक दामोदर यांचा गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते सत्कार
शेगांव :
पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टाकळी विरो येथे कार्यरत असलेले उच्चश्रेणी मुख्याध्यापक तथा उच्चश्रेणी मुख्याध्यापक संघटनेचे तालुकाध्यक्ष,जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त दिपक दामोदर यांचा सेवानिवृत्त निमीत्त निरोप समारंभ कार्यक्रम गटसाधन केंद्र कार्यालय येथे गटशिक्षणाधिकारी एन.डी.खरात यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
उच्चश्रेणी मुख्याध्यापक दिपक दामोदर यांनी शालेय विविध शैक्षणिक उपक्रम, शालेय इमारत रंगरंगोटी व सजावट,शाळेच्या भौतिक सुविधा,ई-लर्निग अध्यापन आदी अनेक शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्याच्या कार्याचा गौरव म्हणून सेवानिवृत्त निमीत्त गटशिक्षणाधिकारी एन.डी.खरात यांनी शालेय,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले.

या प्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल घावट, गटसाधन केंद्राचे विषय शिक्षक विनोद वैतकार,विक्रम फुसे,रमेश वानखडे,श्रीकांत सोनोने,प्रशांत नागे,तुषार धोटे व शिक्षण विभागातील बहुसंख्य कर्मचारी व मित्र परिवार उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश वानखडे यांनी केले तर विनोद वैतकार यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे आभार मानले.