जिल्हा परिषद शाळा कठोरा येथे शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
आरोग्य तपासणी करण्यात आली असता काही किरकोळ दोषी विद्यार्थी आढळून आले
शेगांव :
पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा कठोरा येथे दिनांक १६ सप्टेंबर रोजी इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या १३० विद्यार्थ्यांपैकी १२८ विद्यार्थ्याची वजन,उंची मोजून आरोग्य तपासणी करण्यात आली असता किरकोळ दोषी ५ विद्यार्थी व ५ विद्यार्थींनी असे एकूण १० विद्यार्थी तर संदर्भीत ३ विद्यार्थी व ४ विद्यार्थींनी असे एकूण ७ विद्यार्थी आढळून आले.

याप्रसंगी शाळेतील शिक्षिक सुरेश डोसे,संजय महाले,सचिन वडाळ,सचिन गावंडे,अर्जुन गिरी,शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट यांनी अथक परिश्रम करून आरोग्य तपासणी यशस्वीरित्या पार पाडण्यास सहकार्य केले.