Take a fresh look at your lifestyle.

बापरे! स्वित्झर्लंड देशाची जेवढी संपत्ती तेवढी भारतातल्या ‘या’ एका मंदिराची संपत्ती आहे; आकडा वाचून तुम्हीही तोंडात बोटे घालाल

0

आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आपल्या भारत देशाला पुरातन काळापासूनच खूप मोठ्या प्रमाणात इतिहास लाभलेला आहे. मग या इतिहासावरती जस-जसे संशोधन केले जाते, तस-तसे नवनवीन गूढ हे उलघडत जाते. त्यामुळे पहिल्यांदा आपल्या भारत देशाला ‘सोने की चिडीया’ असे बोलले जायचे. मात्र परकीय राजवटीने आपल्या भारत देशावर आक्रमण केल्याने, देशातील अनेक सोने-नाणे लुटले गेले. तसेच देशातील खूप मोठ्या प्रमाणातील इतिहास सुद्धा पुसण्यात आला. मात्र आजच्या लेखात आपण भारतातील सर्वात श्रीमंत मंदिराचा इतिहास आणि त्यामागील काही रहस्य पाहणार आहोत.

हे मंदिर म्हणजे, केरळचे पद्मनाभ मंदिर होय. हे मंदिर विष्णू देवाला समर्पित असून मंदिराच्या गर्भागृहात शेषनागवार शयन मुद्रेत भगवान विष्णुंची महाकाय मूर्ती विराजमान आहे. असे म्हणले जाते की, या मंदिराची संपत्ती ही स्वित्झर्लंड देशाच्या एकूण संपत्ती एवढी आहे.

मंदिराचा इतिहास पहायला गेले तर, या केरळच्या पद्मनाभ मंदिराचा ९ व्या शतकातील ग्रंथांमध्ये सुद्धा स्पष्ट उल्लेख केलेला आढळतो.

तसेच अगदी मंदिराचा अलीकडील इतिहास पाहायचा झाला तर, १८ व्या शतकात त्रावणकोर राजाने या पद्मनाभ मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. असा इतिहास आपल्याला सापडतो.

मात्र १७५० मध्ये महाराज मार्तंड वर्मा यांनी स्वत:ला ‘पद्मनाभ दास’ म्हणजेच ‘प्रभूचा सेवक’ अशी उपाधी धारण करून घेतली. त्यानंतर त्रावणकोर घराण्याने स्वत:ला भगवान पद्मनाभाच्या चरणी अर्पण केले आणि सर्व संपत्ती मंदिराला दान केली. असा इतिहास आपल्याला या केरळच्या पद्मनाभ मंदिराचा पहायला मिळतो.

पुढे या मंदिरातली संपत्ती आपण पाहायला गेलो तर, या मंदिरात सुमारे १,३२,००० करोड किंमतीची संपत्ती असल्याचे सांगितले जाते. ज्यामध्ये १,३२,००० करोड किंमतीचे सोने, हिरे आणि इतर मौल्यवान वस्तू आढळून आल्या आहेत.

या मंदिरातील तळघरात एकूण सात दरवाजे आहेत. त्यातील सहा दरवाजे उघडताच १,३२,००० कोटींची संपत्ती मिळाली होती. मात्र यातील अद्याप सातवा दरवाजा उघडलेला नाही.

कारण हा सातवा दरवाजा उघडण्यामागे अनेक आख्यायिका आहेत. त्यामुळे हा सातवा दरवाजा आजून सुद्धा बंदच आहे. तसेच, हा सातवा दरवाजा उघडल्यास प्रकोप होऊ शकतो अशी शंका देखील येथील स्थानिकांच्या मनात आहे.

विशेष म्हणजे, या सातव्या दरवाजाला कोणतीही कडी किंवा टाळे नाहीत. तसेच दरवाज्यावर दोन सापांच्या प्रतिमा आहेत. आणि हे सापच या दरवाज्याचे संरक्षण करतात असे मानले जाते.

याचसोबत एखादा सिद्ध पुरुष, योगी, तपस्वीच ‘गरुड मंत्राचा’ अचूक आणि स्पष्ट उच्चार करून हा दरवाजा उघडू शकतो असे म्हणले जाते.

तसेच जर मंत्र उच्चारणात चूक झाली तर त्याचा मृत्यू होणे अटळ आहे अशी दृढ श्रद्धा सुद्धा इथल्या भाविकांमध्ये आहे. त्यामुळे आजूनही या मंदिराचा सातवा दरवाजा बंद आहे.

या मंदिराची सध्याची परिस्थिती पहायला गेले तर, भारत सरकारने या मंदिराचा ताबा न घेता, त्रावणकोर घराण्याच्या वंशजांना हे मंदिर दिले आहे. तसेच सध्या त्यांच्या देखरेखीखाली एक खाजगी ट्रस्ट या मंदिराचे कामकाज पाहत आहे.

-निवास उद्धव गायकवाड

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.