शिक्षण परिषद शनिवार ऐवजी इतर कोणत्याही दिवशी आयोजित करा
गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे प्रहार शिक्षक संघटनेची निवेदनामार्फत मागणी
शेगांव :
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शाळा शैक्षणिक प्रगत करण्यासाठी दरमहा शाळेला अर्धा दिवस असलेल्या सुट्टीच्या कालावधीत शिक्षण परिषद आयोजित करण्यात येते,परंतू शनिवारी शाळेला अर्धा दिवस सुट्टी असल्यामुळे शनिवारी शाळेचे कामकाज केल्यानंतर शिक्षकांना संपुर्ण दिवसभर शिक्षण परिषदेला उपस्थित राहावे लागते.
शनिवारला जोडून रविवारची सुट्टी असल्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्य विषयक दवाखान्याची कामे,परगावी शिकत असलेल्या मुलांच्या शैक्षणिक गरजा भागविण्याची कामे व इतर महत्त्वाची खाजगी कामे करण्यासाठी शिक्षकांना अडचण व समस्या निर्माण झालेली असल्यामुळे दरमहा शिक्षण परिषदेचे आयोजन शनिवार ऐवजी पुर्ण वेळ शाळा असलेल्या इतर कोणत्याही दिवशी आयोजित करण्यात यावे अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या मार्गदर्शनानुसार गटशिक्षणाधिकारी एस.डी.वायदंडे यांच्याकडे तालुकाध्यक्ष सुनिल घावट यांनी निवेदनामार्फत केली आहे.
याप्रसंगी शिक्षक सुरेश डोसे व आदी शिक्षक उपस्थित होते.