Take a fresh look at your lifestyle.

HSC Result 2022 – आज जाहीर होणार बारावीचा निकाल शेवटच्या क्षणी करू नका गडबड; तुमचा निकाल बघण्यासाठी इथे करा क्लिक

0

HSC Result 2022 Maharashtra

HSC Result – आज जाहीर होणार बारावीचा निकाल ०८ जून २०२२
विद्यार्थी आणि पालकांची धडधड वाढवणारे काही तास….

 

सर्वाना माहितच आहे कि कोरोना च्या या महामारीच्या काळात घातलेल्या निर्बंधांमुळे जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी घरात राहूनच ऑनलाईन क्लास मध्येच अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला होता. विद्यार्थ्यांकडून बरेचदा ऑनलाईन अभ्यास केल्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी करणायत आली होती. पण शासन निर्णयाप्रमाणे बारावीच्या परीक्षा मार्च महिन्यात प्रत्यक्ष हजर राहून म्हणजे ऑफलाईनच घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे २०२२ या वर्षाच्या निकालाविषयी विद्यार्थी आणि पालकवर्गामध्ये खूपच उत्सुकता आहे आणि टेन्शन पण आहे.

उद्या म्हणजेच ०८ जून २०२२ रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

निकाल कसा बघायचा

  • या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वर किंवा वर उपलब्ध असलेल्या इतर वेबसाईट वर  भेट द्या
  • त्यानंतर मुखपृष्ठावर / Home Page वर दिलेल्या HSC Result 2022/ १२ वी निकाल २०२२ या लिंक वर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल.
  • या ठिकाणी विद्यार्थ्याने त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख अशी माहिती टाकून सबमिट बटन वर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला तुमचा बारावीचा निकाल दिसेल.
  • निकाल तुम्ही PDF स्वरुपात Download करून सेव करून ठेवू शकता.

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबातची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

नापास विद्यार्थ्यांकरिता सूचना

जे विद्यार्थी पास होणार नाही त्यांच्या करिता जुलै-ऑगष्ट २०२२ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दिनांक १०/०६/२०२२ पासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत. याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार असल्याचे समजते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.