Take a fresh look at your lifestyle.

जातेगाव : दिंडीत बस घुसल्याने एका भाविकाचा मृत्यू

एक ठार तर नऊ जण गंभीर जखमी

0

जातेगाव : ज्योत घेऊन चाललेल्या भाविकांच्या दिंडीत भरधाव खासगी बस घुसल्याने एक ठार तर नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील हिरापूर येथे बुधवारी घडली.

अरणवरून गायकवाड जळगावकडे (ता. गेवराई) भावित जात होते. हिरापूरजवळ दिंडीत भरधाव खासगी बस (एमएच २०, ईजी- ००५५) घुसली. त्यात हनुमंत अण्णासाहेब आगरकर (वय ४२) यांचा जागीच मृत्यू झाला. विश्वंभर अंतरकर, शैलेश कातखडे, ऋषीकेश आगरकर, महादेव जावळे, परमेश्वर पांगरे, रविराज आगरकर, गजानन वाघमारे, नंदू आगरकर, बाळू आगरकर आदी भाविक जखमी झाले. जखमींना बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हनुमंत आगरकर यांची नेत्रदानाची इच्छा व्यक्त केलेली होती. त्यानुसार कुटुंबातील सदस्यांनी नेत्रदानासंदर्भातील अर्ज दाखल केला.

Leave A Reply

Your email address will not be published.