Take a fresh look at your lifestyle.

भारतीय हवाई दलानं रद्द केला पोखरणमध्ये होणारा सरावाचा कार्यक्रम

भारतीय हवाई दलाचा (IAF) 'वायुशक्ती 2022' (Vayu Shakti 2022) हा कार्यक्रम हवाई दलाने पुढे ढकलला आहे.

0

भारतीय हवाई दलाचा (IAF) ‘वायुशक्ती 2022’ (Vayu Shakti 2022) हा कार्यक्रम हवाई दलाने पुढे ढकलला आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) सीमेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोखरणमध्ये (Pokhran) 7 मार्चला हवाई दल शक्तीप्रदर्शन करणार होतं. हा सराव दर तीन वर्षातून एकदा आयोजित केला जातो, ज्यामध्ये भारतीय हवाई दलाची ताकद दाखवली जाते. त्याचबरोबर देशाचं रक्षण करण्यासाठी आणि शत्रूचा सामना करण्यासाठी हवाई दल पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही देशाला देण्यात येते. मात्र यंदा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार होते अशी माहिती मिळते आहे.

वायु शक्ती सराव केवळ हवाई दलाचं सामर्थ्यच दाखवत नाही तर हवाई दलासाठी ऑपरेशनल प्रशिक्षणाचा तो महत्वाचा भाग आहे. प्रत्यक्ष युद्धासारखी निर्माण करून ऑपरेशन केलं जातं. वायु शक्ती सरावात एकूण 148 विमानं सहभागी होणार होती. यामध्ये नल एअरबेसवरून 18, फलोदी एअरबेसवरून 29, जोधपूरहून 46, जैसलमेरहून 30, उत्रलाई येथून 21, आग्रा येथून 2 आणि हिंडन एअरबेसवरून 2 विमाने टेक ऑफ करतील. 109 लढाऊ विमाने, 24 हेलिकॉप्टर, 7 वाहतूक विमानांचाही समावेश होणार होता. मात्र आता हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.