Take a fresh look at your lifestyle.

रोज दूध पिता पण भेसळयुक्त दूध असल्याने आरोग्याला काहीच परिणाम होत नाही? तर ‘अशा’ पद्धतीने ओळखा भेसळयुक्त दूध

0

आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आपण दुधाला याआरोग्याच्या दृष्टीने खुप किंमत देतो. दूध पिणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळेच आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी दुधाचे सेवन करत असतात.

असे म्हणले जाते की दूध पिल्याने आपल्या शरीराची हाडे मजबूत राहतात. तसेच दूध पिल्याने आपल्या शरीरात कॅल्शियम आणि प्रथिने वाढण्यास मदत होते.

मात्र या सर्व गोष्टी मिळण्यासाठी लोक कंडेन्स्ड दूध घेण्याचा प्रयत्न करतात. पण याही दुधात भेसळ होत असल्याने, लोकांचे आरोग्य सुधारण्या ऐवजी लोकांना अनेक रोग तसेच दुष्परिणामांना सामोरे जावे लागते.

मात्र आजच्या लेखात आपण भेसळयुक्त दूध कसे ओळखायचे आणि शुद्ध व आरोग्याला पोषक अशा दुधाचे सेवन कसे करावे हे आपण पाहणार आहोत.

भेसळयुक्त दूध ओळखण्याची ट्रिक पुढील प्रमाणे

१) बरेच दूध विक्रेते अधिक नफ्याच्या हव्यासापोटी दुधात डिटर्जंट पावडर मिसळतात. मात्र आपल्याला हे माहीत नसते. अशावेळी समान प्रमाणात पाण्यात ५-१० एमएल दूध मिसळावे आणि नंतर ते ढवळून घ्यावे. यानंतर, जर त्यामध्ये फेस तयार होत असेल, तर याचा अर्थ दुधामध्ये भेसळ आहे.

२) दुधात युरिया आहे की नाही. हे आपण एका चाचणी ट्यूबद्वारे शोधू शकतो. ते कसे? तर, या चाचणी ट्यूबमध्ये एक चमचा दूध घाला आणि नंतर त्यात अर्धा चमचा वाटाणे पूड किंवा अर्धा चमचा सोयाबीन पावडर घाला. यानंतर, ते चांगले मिसळल्यानंतर ५ मिनिटांनंतर त्यात लाल लिटमस कागद घाला. या प्रकरणात ३० सेकंदानंतर जर रंग लाल पासून निळ्यामध्ये बदलला तर या दुधात युरिया आहे असे समजा.

३) आपण घरातील एका उताराच्या जागेवरुन दुधाचा थेंब खाली सोडा. या प्रकरणात, जर एखादे ट्रेस न सोडता दूध खाली वाहत असेल तर समजून जा की त्यात पाणी आहे आणि जर दुधाचा थेंब हळूहळू खाली जात असेल तर हे दूध भेसळ केलेले नाही असे समजा.

तर या होत्या घरीच भेसळयुक्त दुध शोधण्याच्या काही ट्रिक्स. अशाच पद्धतीने आपल्या आरोग्याच्या घरीच समस्या सोडवण्यासाठी आमचे इतर लेखही वाचायला विसरू नका.

-निवास उद्धव गायकवाड

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.