Take a fresh look at your lifestyle.

‘दोन्ही डोस घेतलेत म्हणून निर्धास्त राहू नका, कारण…’; डेल्टा व्हेरिएंटबाबत WHO ने दिली महत्वाची माहिती

0

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. अशात WHO ने डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत महत्वाची माहिती दिली आहे. कोरोनाच्या व्हेरिएंटपैकी डेल्टा प्लस व्हेरिएंट आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्ग करणारा विषाणू असल्याचं WHO ने सांगितलं आहे.

डेल्टा प्लस व्हेरिएंट खूप वेगाने पसरत आहे. अनेक देशांमध्ये या विषाणूने लाखो लोकांना बाधित केलंय. दुसरीकडे जगातील मोठ्या प्रमाणात नागरिकांना लस देणं बाकी आहे. लस घेतलेले नाही अशा नागरिकांमध्ये डेल्टा संसर्ग अधिक वेगाने होताना दिसत आहे, असं WHO ने सांगितलं.

कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेत म्हणून लोकांनी निर्धास्त किंवा निष्काळजी होऊ नये. त्यांना अजूनही कोरोना विषाणूचा धोका कायम आहे. लस घेतलेले एकटे समुह संसर्ग रोखू शकत नाही. नागरिकांनी सातत्याने मास्कचा वापर करायला हवा. मोकळ्या हवेच्या ठिकाणी राहायला हवं, असं डब्लूएचओचे अधिकारी मरियांगेला सिमाओ म्हणाले.

गर्दी करणं टाळलं पाहिजे आणि हात नियमितपणे स्वच्छ केले पाहिजे. तुम्ही लसीचे दोन्ही डोस घेतलेले असले तरी हे सर्व करणं तितकंच आवश्यक आहे. कारण डेल्टा व्हेरिएंट खूप वेगाने संसर्ग करत असल्याचं समोर आलंय, अशी माहिती मरियांगेला सिमाओ यांंनी दिलीये.

Leave A Reply

Your email address will not be published.