Take a fresh look at your lifestyle.

पत्नीवरील चारित्र्याचा संशय चिमुकलीच्या जीवावर बेतला; क्षणात उद्धवस्त झालं कुटुंब

0

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात एका पित्यानं आपल्या पत्नीच्या चारित्र्याच्या संशयातून दीड वर्षाच्या लेकीचा जीव घेतला आहे.

लातूर : लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात एका पित्यानं (Father) आपल्या दीड वर्षाच्या चिमुकलीला (One and Half years old daughter) पाण्याच्या हौदात बुडवून (drowning in tank) हत्या (Murder) केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलास ताब्यात घेतलं असून प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

संबंधित घटना औसा तालुक्यातील आशिव याठिकाणी घडली आहे, तर सृष्टी संतोष भोंडे असं हत्या झालेल्या दीड वर्षीय मुलीचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडील संतोष गंगादास भोंडे याला अटक केली आहे. आरोपीला दारुचं व्यसन आहे. मागील काही दिवसांपासून तो पूर्णपणे व्यसनाच्या आहारी गेला होता. दारूच्या पैशासाठी तो नेहमी आपल्या पत्नीसोबत आणि वडील गंगादास भोंडे यांच्यासोबत कुरापती काढत असायचा. यावरून त्यांच्या घरात सतत भांडणं होतं असत. त्याचबरोबर आरोपी भोंडे पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असे.

शुक्रवारीही आरोपीनं आपल्या पत्नी आणि वडिलांसोबत किरकोळ कारणावरून वाद उकरून काढला. यामुळे पती आणि पत्नीत कडाक्याचं भांडण झालं. यामुळे संतापलेल्या संतोषनं बायकोचा राग आपल्या दीड वर्षाच्या मुलीवर काढला. त्यानं घरातील पाण्याच्या हौदात दीड वर्षाच्या मुलीला टाकलं. कुटुंबीयांना काही कळायच्या आत चिमुकलीच्या नाका-तोंडात पाणी शिरून तिचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी आरोपीचे वडील गंगादास भोंडे यांच्या तक्रारीवरुन भादा पोलिसांत शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वडील संतोष भोंडेला भादा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास भादा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नाना लिंगे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.