Take a fresh look at your lifestyle.

शिक्षकांच्या हितासाठी फक्त पतंग निशानीवरच मारा शिक्का समता पॅनलचे आवाहन

शिक्षक मतदारांचा समता पॅनलच्या उमेदवारांना उत्स्फूर्त पाठिंबा

0

शेगांव : 
शिक्षक सहकारी पतसंस्था र.न.९५३ च्या निवडणुकीमध्ये शिक्षक हिताच्या निर्णयासाठी समता पॅनलच्या तेराही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन समता पॅनलच्यावतीने करण्यात आलेले असुन शिक्षकांच्या आर्थिक हिताचे निर्णयाचा जाहिरनामा घोषीत करण्यात आलेला आहे,यामध्ये प्रामुख्याने कर्ज मर्यादा टप्प्याटप्पाने १० लाख रूपया पर्यंत करणे,कर्ज व्याजदर कमी करणे,प्रत्येक कर्जावळी घेतला जाणारा इमारत निधी (बिल्डींग फंड) बंद करणे,मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीच्या हमीपत्राने कर्ज मंजुर करणे,कर्जदार सभासदांचे आकस्मिक निधन झाले तर सभासदांवर बाकी असलेल्या रक्कमेचे संपूर्ण कर्ज माफ करणे,निकडी (तातडीचे ) कर्ज मर्यादा ५० हजार रूपये करणे,सर्व सभासदांना कर्ज माहितीचे दरमहा भ्रमणध्वनीवरून एमएमएस सुविधेद्वारी माहिती पुरविणे.मृत्यु अनुदान निधी ५ लाखापर्यंत वाढविणे,संस्थेचे व सभासदांसाठी करण्यात येणारे संपूर्ण आर्थिक व्यवहार भारतीय स्टेट बॅकेत करणे,सेवानिवृत्त सभासदांचा ११००० रूपयाचा धनादेश देऊन सत्कार करणे,कन्यादान योजनेअंतर्गत सभासदांच्या मुलीच्या लग्नवेळी ११००० रुपये सस्नेह भेट देणे,संस्थेचा कारभार पारदर्शक करणे,सभासद संख्येत वाढ करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करून सभासद संख्या वाढविणे,लाभांश व कर्ज व्याज दर यामधे एक टक्क्यापेक्षा जास्त तफावत राहणार नाही याची दक्षता घेवून लाभांश वाटप करणे,संस्था स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने अंतर्मुख होऊन प्रत्येकाने लोकशाही पध्दतीमध्ये गुप्त मतदान असल्यामुळे कोणत्याही दबाव तंत्राला न जुमानता निर्भीडपणे मतदान करावे असे आवाहन समता पॅनलच्यायतीने करण्यात आले आहे.

शिक्षक सहकारी पतसंस्थेत आता मात्र बदल करण्याची गरज आहे,आणि यावेळी तो बदल समता पॅनलच्यावतीने घडूनही येण्यासाठी व शिक्षक हितासाठी फक्त पतंग निशानीवर शिक्का मारून तेराही संचालकांना विजयी करण्याचे श्यामकुमार डाबेराव, सुनील घावट, एस.बी. मसने, रवींद्र माळवे,अजाबराव पहुरकर, विनोद खवले, संजय धनोकार कु.वर्षा अघडते, कु. माया गणवीर, सलीम खान मिया खान, संजय सोळंके, ज्ञानदेव ताठे, कु. उषा पाटील, राजू पेटकर, संतोष बोराडे, शालिग्राम मानकर, सुभाष रावरकर, शैलेश साखरे, संजय गजाम, सुनिल तांदळे, सौ. सुनीता आडे, सुधीर बागडे, अनिल केसकर, कु. मेघा साबळे, विनोद परतेकी, माणिकराव देशमुख, बाळु आडे, सुर्यकांत हिवराळे, शकील अहमद पीर महंमद व समस्त समता पॅनलचे समर्थक शिक्षकांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.