Take a fresh look at your lifestyle.

अपु-या तरतुदीमुळे जिल्हयातील शिक्षकांचे रखडलेले वेतन तात्काळ अदा करा.

प्रहार शिक्षक संघटनेने आक्रमक भुमिका घेऊन केली शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनामार्फत मागणी

0

बुलडाणा : 
जिल्हयातील प्राथमिक शिक्षकाचे शासन परिपत्रकानुसार माहे ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपुर्वी करण्यासंदर्भात आदेश निर्गमित करण्यात आलेले होते,परंतू जिल्हा प्रशासनाकडून शिक्षकांच्या वेतनाकरिता अपुरे वेतन तरतुद असल्याची सबब सांगण्यात आली.अद्यापपर्यंत शिक्षकांना वेतन तरतुद उपलब्ध होईल याची प्रतिक्षा केली परंतू अद्यापपर्यंत वेतनाच्या संपुर्ण रक्कमेची तरतुद उपलब्ध न झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून भविष्य निर्वाह निधी,टीडीएस,पतसंस्थेच्या कर्जाच्या कपात वगळून दरमहा मिळणा-या निव्वळ देय रक्कमेचे वेतन अदा करावे व शासनस्तरावरून वेतनाची तरतुद उपलब्ध होईल त्यावेळी भविष्य निर्वाह निधी,टीडीएस, पतसंस्था कर्ज,तसेच अन्य कपाती संबंधित विभागाला अदा करण्यात याव्यात व प्राथमिक शिक्षकांचे निव्वळ देय रक्कमेचे वेतन अदा करण्यासाठी जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेने आक्रमक भुमिका घेऊन जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांनी निवेदन दिले आहे व शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) किशोर पागोरे यांच्याशी या विषयासंदर्भात चर्चा सविस्तर करण्यात आली आहे.

यासंदर्भात शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) किशोर पागोरे यांनी प्रहार शिक्षक संघटनेच्या मागणीची दखल घेऊन लवकरच जिल्हयातील शिक्षकांना निव्वळ देय रक्कमेचे वेतन अदा करण्याचे आश्वासन दिले आहे.

वेतन विलंबामुळे जिल्हयातील शिक्षकांना आर्थिक अडचणीशी सामना करावा लागत आहे त्यामुळे शिक्षकांच्या कर्जाच्या कपाती वजा करून निदान केवळ निव्वळ देय रक्कम तरी अदा करा याकरिता प्रहार शिक्षक संघटनेने आक्रमक भुमिका घेतलेली आहे.

महेंद्र रोठे,जिल्हाध्यक्ष

जिल्हयातील शिक्षकांना माहे ऑक्टोबरचे वेतन शासन परिपत्रकानुसार दिवाळी पुर्वी अदा करणे अपेक्षित होते परंतू अद्यापपर्यंतही शिक्षकांना वेतन अदा न झाल्यामुळे शिक्षक अत्यंत आर्थिक अडचणीत आलेले आहेत,तरी प्रात असलेल्या वेतन तरतुदीमधून वेतनाच्या अन्य कपाती वजाती करून तुर्त निव्वळ देय रक्कमेचे वेतन शिक्षकांना तात्काळ अदा करावे व शासनस्तरावरून वेतन तरतुद प्राप्त होताच अन्य कपातीचे वेतन पतसंस्था कर्ज, बॅक कर्ज व अन्य कपाती संबंधितांना अदा करण्यात याव्यात.
– महेंद्र रोठे,जिल्हाध्यक्ष
प्रहार शिक्षक संघटना बुलडाणा

शिक्षकांचे रखडलेले वेतन,

प्रहार शिक्षक संघटना,

बुलडाणा

Leave A Reply

Your email address will not be published.