विद्यार्थ्याच्या शासकीय योजना व शिष्यवृत्तीच्या आर्थिक रक्कमेमध्ये वाढ करा
शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्याकडे प्रहार शिक्षक संघटनेची मागणी
शेगांव :
विद्यार्थ्याचे शैक्षणिक हित व आर्थिक परिस्थिती लक्षात घेता शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजाची आर्थिक पूर्तता होण्यासाठी प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष सुनिल घावट यांनी जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या मार्गदर्शनानुसार नगर पंचायत संग्रामपुर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये मोफत गणवेश योजनेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वितरीत करणे,दारिद्रय़रेषेखालील
विद्यार्थीनीनां प्रतिदिन एक रुपया उपस्थिती भत्ता अदा करण्यात येत आहे.
एक रुपया ऐवजी प्रतिदिन दहा रूपये अदा करणे,अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष शिष्यवृत्तीची किमान दोन हजार रुपयांपर्यंत वाढ करणे,ओटीएसपी योजनेअंतर्गत विमुक्त जाती,भटक्या जमातीच्या शालेय विद्यार्थ्यांना फक्त ५७ रूपये २० पैसे ऐवजी किमान ३०० रुपयांपर्यंत वाढ करणेबाबत,गणवेश लेखन साहित्य योजनेअंतर्गत एका वर्षाचे फक्त १२ रूपये राज्य शासनाकडून अदा करण्यात येतात, सदर रक्कमेमध्ये वाढ करणे,समाजकल्याण अंतर्गत विद्यार्थ्यांना अदा करण्यात येणा-या विविध शिष्यवृत्तीचे दर अल्प असल्यामुळे सदर रक्कमेमध्ये दरवाढ करणे आदी मागण्यांचे निवेदन दिले आहे.
याप्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.