Take a fresh look at your lifestyle.

‘जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’, PM मोदींचा नवा नारा

'जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान'

0

‘जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’, असा नवा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी दिनी दिला. आज भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजवंदन केलं. यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केलं. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान देणाऱ्या हुताम्यांना अभिवादन करत पंतप्रधानांनी देशवासीयांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.(Independence day pm modi new slogan jai jawan jawan kisan jai vigyan jai ansandha)

पंतप्रधान मोदी यांनी ‘जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’ची घोषणा केली आहे. लाल बहादूर शास्त्रींनी ‘जय जवान, जय किसान’चा नारा दिला. यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी त्यात ‘जय विज्ञान’ जोडले. आणि आता त्यात ‘जय अनुसंधान’ जोडण्याची वेळ आली आहे. आता ‘जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’, असा नारा पंतप्रधानांनी दिला आहे.

देशाला संबोधित करताना मोदी यांनी भारतीयांना पाच संकल्प दिले. येत्या काळात आपण ‘पंचप्राण’ वर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं मोदी म्हणाले. पहिले – विकसित भारताचे मोठे संकल्प आणि संकल्प घेऊन पुढे जा; दुसरे – गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाका; तिसरे – आपल्या वारशाचा अभिमान बाळगा; चौथे – एकतेचे सामर्थ्य आणि पाचवे – नागरिकांची कर्तव्ये ज्यात पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचाही समावेश असेल, असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.