Take a fresh look at your lifestyle.

Nari Shakti: भारतीय सेनेत पहिल्यांदाच मानाचं स्थान मिळवत देशाचं नाव उंचावणाऱ्या महिला

Nari Shakti :भारतात अनेक मोठमोठ्या पदांवर आपल्या जिद्द आणि चिकाटीने महिला पोहोचलेल्या दिसून येतात.

0

Nari Shakti :भारतात अनेक मोठमोठ्या पदांवर आपल्या जिद्द आणि चिकाटीने महिला पोहोचलेल्या दिसून येतात. भारतीय सेनेतही आज अनेक महिला कार्यरत आहेत. मात्र या काही महिलांनी भारतीय सेनेत सहभाग घेत फक्त देशाचे नावच उंचावले नाही तर महिलांसाठी एक आदर्श उदाहरण देखील बनल्या आहेत. आज आपण अश्या महिलांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी सर्वोच्च मान मिळवत त्यांच्या कुटुंबाचं आणि देशाचं नाव मोठं केलंय.

पुनीता अरोडा

पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या पुनीता अरोडाने सशस्त्र सेनेत लेफ्टनंट पद मिळवलं होतं. त्या भारताच्या पहिल्या महिला आहेत ज्यांना हे पद मिळालं होतं. याव्यतिरिक्त पुनीता यांना भारतीय नौदलात एडमायरलचं पद देखील मिळालं होतं. तसेच २००४ मध्ये आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज इन्स्टीट्यूटचं संचालन करणाऱ्या पहिल्या महिलासुद्धा होत्या.

पद्मावती बंदोपाध्याय

भारतीय वायु सेनेत पहिली महिला एयर मार्शलचं पद मिळवणाऱ्या पद्मावती बंदोपाध्याय यांना मिळाला होता. त्यांना १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात मौल्यवान कामगिरीसाठी एका विशिष्ट सेवा मेडलने त्यांचा गौरवही करण्यात आला होता. १९६८ मध्ये पद्मावती या वायुसेनेत सहभागी झाल्या होत्या. त्यांना पहिली एविएशन मेडिसिन स्पेशालिस्टचा दर्जाही दिला गेला होता.

मिताली मधुमिता –

शौर्यासाठी सेना मेडल मिळवणाऱ्या मिताली मधुमिता या २०११ मध्ये देशातील महिला ऑफिसर बनणाऱ्या पहिला महिला आहेत. २६ फेब्रुवारी २०१० मध्ये झालेल्या अफगाणिस्तान आणि काबुल मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हमल्यामध्ये मिताली यांनी सेनेतील अनेक जखमींना वाचवले होते. भारतीची ही शूर महिला २००० साली सेनेत दाखल झाली होती.

मागल्या वर्षी आर्मीच्या सगळ्यात जुन्या रेजिमेंट असम रायफलच्या महिला तुकडीने गणराज्य दिनाच्या दिवशी परेड केली होती. या रेजिमेंटमध्ये महिलांची भर्ती पहिल्यांदा २०१५ मध्ये सुरू झाली होती. आणि एप्रिल २०१६ मध्ये १२४ महिलांची बॅच यशस्वी झाली होती. गणराज्य दिनी परेड करणाऱ्या पहिल्या महिला तुकडीचं नेतृत्व मेजर खुशबू यांनी केलं होतं.

महिला म्हणून भारतीय सेनेत या पदांवर एक वेगळी ओळख निर्माण करत या महिला इतर महिलांसाठी आदर्श बनल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.