Take a fresh look at your lifestyle.

Inflation : ड्रायफ्रुटच्या दरात मोठी वाढ

0

नागपूर : अफगाणिस्तानमध्ये अतिवृष्टीमुळे अंजीर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आवक कमी झाल्याने अंजिराच्या दरात प्रति किलो १०० ते १५० रुपयांची वाढ झालेली आहे. ७०० ते १,००० रुपये प्रतिकिलो विकल्या जाणारे अंजीर आता रुपयांनी वाढून ८०० ते १,१०० रुपयांवर पोहोचले आहे. आगामी दिवसात याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. मार्केटमध्ये बदामची चांगल्याप्रकारे आवक होत आहे.

उत्सवांचे दिवस जवळ आलेले आहेत. त्यामुळे ड्रायफ्रूट्सची मागणी वाढू लागलेली आहे. मागणी वाढताच मार्केटमध्ये काजू, बदामपासून पिस्ताच्या किमतीत वाढ झाली आहे. तसेच सणोत्सवात मिठाईवाल्यांपासून अन्य लोकांची तुकडा काजूला अधिक मागणी असते. बाजारात तुकडा काजूचा तुटवडा आहे. याचे मुख्य कारण फॅक्ट्रिमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. परिणामी तुकड्यांमध्ये घट झालेली आहे. सगळा आणि तुकडा काजूच्या किंमतीत १०० रुपयांचा फरक राहात होता. परंतु, आता तुकडा काजूच्या तुटवड्यामुळे दोन्हीचे दर एकसमान सुरू आहे. सध्या तुकडा आणि सगळा काजूच्या किमती ६५०-६८० रुपये प्रतिकिलो ठोकमध्ये सुरू आहे.

पिस्ताच्या दरात वाढ झालेली आहे. ८०० ते ८५० रुपयेवाला पिस्ता आता ९८० ते १,०८० रुपयांवर पोहोचला आहे. किशमिशचे भाव स्थिर आहे. यात रेग्यूलर किशमिश २०० ते २२० रुपये, क्वॉलिटी माल २६० ते २८० रुपये व एक्स्ट्रॉ प्रीमिअम माल ३०० रुपये प्रतिकिलो मिळत आहे. अखरोटच्या किमती स्थिर आहे. शेलवाला अखरोट ६५० ते ६८० रुपये प्रतिकिलो सुरू आहे.

बाजारातील किंमत (किलोमध्ये)

ड्रायफ्रूट्स किंमत

  • काजू (४००) ६५०-६६०
  • काजू (३२०) ६८०-७१०
  • काजू (२४०) ७५०-८००
  • रेग्यूलर बदाम ६४०-६७०
  • प्रीमिअम बदाम ८००-८१०
  • अंजीर ८००-११००
  • किशमिश २६०-२८०
  • पिस्ता ९८०-१०८०
  • अखरोट (शेल) ६००-६५०

अफगाणिस्तानात अधिक पाऊस असल्याने अंजिराच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे भाव वाढू लागले आहे. पाकिस्तानमार्गे अंजीर येत असल्याने आवकही कमी झालेली आहे. सर्वच ड्रायफ्रुटचे दर दिवाळीच्या तोंडावर वाढण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.