जि.प.शाळा कठोरा येथे आंतरराष्ट्रीय हात धुवा दिवस साजरा
हात धुऊन उत्तम आरोग्य राखण्याचे शालेय विद्यार्थ्यांना आवाहन
शेगांव :
पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा येथे दि.१५ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय हात धुवा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सहाय्यक शिक्षक सुरेश डोसे, संजय महाले,अर्जुन गिरी,सचिन गावंडे,सचिन वडाळ यांनी हात धुण्याचे शास्त्रोक्त प्रात्यक्षिक व हात धुण्याचे महत्व भाषणातून सांगितले
हात धुणे ही अत्यंत साधी सोपी व रोजच्या जीवनातील सहज घडणारी
क्रिया आहे,हात न धुतल्यामळे
आपल्याला होणा-या आजारांपैकी ७० टक्के आजार हे अस्वच्छतेमुळे होतात. वेळच्या वेळी हात स्वच्छ न धुतल्यामुळे, हाताच्या संपर्काने रोगजंतू तोंड ,नाक ,डोळे याचे मार्फत शरीरात प्रवेश केल्यामुळे आजार उद्भवतात असे स्वच्छतेचे महत्त्व शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट यांनी विद्यार्थ्यांना मनोगतातून सांगितले.
याप्रसंगी इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीचा विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शास्त्रोक्त पध्दतीने हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविताना शिक्षक वृंद