Take a fresh look at your lifestyle.

IPhone 11 मिळतोय २५,००० पेक्षाही कमी किंमतीत; जाणून घ्या Flipkart ची जबरदस्त ऑफर

जर तुमचे आयफोन घेण्याचे स्वप्न असेल तर ते पूर्ण करण्याची वेळ आली आहे. फ्लिपकार्टवर iPhone 11 ची किंमत २५,०००पेक्षा कमी झाली आहे.

0

आयफोन खरेदी करण्याचं अनेकांच स्वप्न असत. मात्र, बजेट नसल्याने काहीजणांना तो खरेदी करता येत नाही. पण आता तुमचे आयफोन घेण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्याची वेळ आली आहे. कारण iPhone 11 आता २५,००० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळत आहे. होय, तुम्ही iPhone 11 चा बेस व्हेरिएंट (६४जीबी) फ्लिपकार्ट वरून प्रत्यक्षात खरेदी करू शकता. या फोनची किंमत फ्लिपकार्टवर ४९,९०० रुपये असली तरी फ्लिपकार्टवर १५ टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे. १५ टक्के डिस्काउंटनंतर त्याची किंमत ४१,९९९ होईल. जर तुमच्याकडे जुना iPhone असेल जो चांगल्या स्थितीत असेल तर तुम्ही त्याची देवाणघेवाण करून १७,००० पर्यंत सूट मिळवू शकता. अशा प्रकारे iPhone 11 च्या ६४जीबी वेरिएंटची किंमत २४,९९९ रुपये होईल.

तसंच, हे लक्षात घेणे महत्वाचं आहे की, जुन्या आयफोनवर मिळणारी एक्सचेंज सूट ही स्मार्टफोनच्या मॉडेलवर आणि त्याच्या स्थितीवर अवलंबून असते. Flipkart फोनवर बँक ऑफर देखील देत आहे, ज्यात Citi क्रेडिट आणि डेबिट कार्डवर १० टक्के सूट आहे. याशिवाय Flipkart Axis Bank कार्डवर ५ टक्के कॅशबॅक देखील आहे.

जर तुम्हाला iPhone 11 चा १२८जीबी व्हेरिएंट फक्त काळ्या रंगात खरेदी करायचा असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की ते डिस्काउंट आणि इतर ऑफर्ससह देखील उपलब्ध आहे. १० टक्के सूट नंतर ४८,९९९ रुपयांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. ६४जीबी वेरिएंट प्रमाणे यावरही एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफर आहेत. तुमच्या माहितीसाठी Apple iPhone 11 मध्ये ६ १ इंचाचा Liquid Retina HD डिस्प्ले आहे आणि तो A13 बायोनिक चिपवर चालतो. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप (१२एमपी + १२एमपी) आणि १२एमपी फ्रंट कॅमेरा आहे.

फ्लिपकार्टवर आयफोन 11 कसा खरेदी करायचा?

  • फ्लिपकार्ट वर जा.
  • तेथे iPhone 11 शोधा.
  • तुमच्याकडे जुना फोन असल्यास ‘बाय विथ एक्सचेंज’ वर क्लिक करा.
  • रंग आणि प्रकार निवडा.
  • आता buy now करा आणि पेमेंटवर प्रक्रिया करा. पेमेंट करताना तुम्ही बँक ऑफर देखील लागू करू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.