Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांनी निर्व्यसनी घडून आई वडिलांची सेवा करणे काळाची गरज – पत्रकार सतीश पाटील तेजनकर

0

लोणार प्रतिनिधी :- उध्दव नागरे
वारकरी बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून शिकून विद्यार्थ्यांनी समाजामध्ये निर्व्यसनी राहुन जगण्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा.आजचे लहान मुले हे देशाचे उद्याचे भविष्य असून त्यांना शिक्षणासोबतच वारकरी संप्रदायाचे व सामाजिक जीवनात वावरण्याचे ज्ञान मिळणे गरजेचे झाले आहे.कारण आजची तरुण पिढी ही जास्त प्रमाणात व्यसनाधीन होऊन स्वतःच्या आई-वडिलांना सांभाळण्यास नकार देत आहेत.म्हणून या वारकरी संप्रदायाची शिकवण अंगीकारून या तरुण पिढीने व्यसनमुक्त होऊन स्वतःच्या आई-वडिलांना चांगले सांभाळावे.

असे प्रतिपादन कै.परमेश्वर उत्तमराव तेजनकर पाटील बहुउद्देशीय संस्थेचे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सतीश पाटील तेजनकर यांनी श्री क्षेत्र शंकर गड जागदरी येथे माऊली वारकरी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन सोहळा निमित्त दिनांक 8 मे 2022 ते 20 मे 2022 पर्यंत सुरू असलेल्या वारकरी बाल संस्कार शिबिराला दि.12 मे रोजी भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी शिबिराचे आयोजक तथा माऊली वारकरी शिक्षण संस्था चे अध्यक्ष श्री.ह.भ.प.रामायणाचार्य सतीश महाराज डोईफोडे यांनी सतीश पाटील तेजनकर व दीपक मधुकर खरात यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.तर शिबिराला उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.