Take a fresh look at your lifestyle.

जळगाव : खत कंपनीच्या अधिकाऱ्यांचा गोलमाल

जळगाव : कृषी खत कंपनीच्या जिल्ह्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याने वितरकांशी संगनमत करून विनानोंदणीच्या कृषी केंद्रांना खतांचा पुरवठा करून कंपनीला एक कोटी ३० लाखांचा चुना लावला.

0

जळगाव : कृषी खत कंपनीच्या जिल्ह्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याने वितरकांशी संगनमत करून विनानोंदणीच्या कृषी केंद्रांना खतांचा पुरवठा करून कंपनीला एक कोटी ३० लाखांचा चुना लावला. शनिपेठ पोलिसांत याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुण्यातील एका कंपनीत झोनल सेल्स मॅनेजर पदावर वैभव कमलकिशोर राठी कार्यरत आहे. कंपनीच्या ध्येयधोरणानुसार ही कंपनी केवळ नोंदणीकृत कृषी केंद्रांना खतांचा पुरवठा करते.

जिल्ह्यासाठी जळगाव गोल्डन ट्रान्स्पोर्टचे मालक राधेश्याम सूरजमल व्यास व नितीन मदनलाल व्यास यांच्याशी (वर्ष २०११ ते २०१८ पर्यंत) करार करण्यात आला होता. मात्र, जळगाव गोल्डन ट्रान्स्पोर्टचे नाव बदलून राधेश्याम सूरजमल व्यास या नावाने त्यांनी नवीन फर्म सुरू केली. असे असताना करारानुसार कंपनीकडून आलेला माल गुदामात (कानळदा रोडवर अव्हाणे गावाजवळील गुदामातून) साठवून त्याची विक्री सुरू होती.

Leave A Reply

Your email address will not be published.