Take a fresh look at your lifestyle.

जळगाव : कामाच्या नावाखाली खडीने व्यापलेला रस्ता

जळगाव : पांडे डेअरी ते इच्छादेवी चौकापर्यंतच्या सिंध कॉलनी मार्गाची दुरवस्था शेतरस्त्यापेक्षाही वाईट झाली आहे.

0

जळगाव : पांडे डेअरी ते इच्छादेवी चौकापर्यंतच्या सिंध कॉलनी मार्गाची दुरवस्था शेतरस्त्यापेक्षाही वाईट झाली आहे. त्यातच या रस्त्याचे काम करायच्या नावाखाली दोन महिन्यांपासून रस्त्याच्या दुतर्फा खडीचे ढीग टाकून ठेवल्याने वाहतूक कोंडी होत आहे. शहरातील अन्य रस्त्यांच्या दुरवस्थेप्रमाणे महापालिका प्रशासन याबाबत ढीम्म आहे. जळगाव शहरातील रस्त्यांची अवस्था ग्रामीण रस्त्यांपेक्षाही बिकट आहे. किंबहुना जळगावात रस्ते नावाचा प्रकारच शिल्लक नाही. त्यातही काही रस्त्यांबाबत तर बोलायलाच नको. पांडे डेअरी ते इच्छादेवी चौक व पुढे थेट डी-मार्टपर्यंतच्या रस्त्याची अवस्था तर अत्यंत भीषण आहे. पायी चालणेही कठीण, अशी त्याची स्थिती आहे.

रस्तेकामांच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या महापालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी या रस्यासह प्रमुख रस्त्यांच्या कामांचे मुहूर्त काढले आहेत. परंतु, त्या मुहूर्तांना या रस्त्यांची कामे सुरू होऊ शकलेली नाहीत.

धुळीचे साम्राज्य

या रस्त्यावरून हजारो वाहने दिवसभर ये-जा करत असतात. रात्री अकरापर्यंत व त्यानंतरही रस्त्यावरील वाहतूक सुरूच असते. त्यातच संपूर्ण रस्त्याची अवस्था खड्ड्यांची झाली असून, त्यामुळे या मार्गावरून प्रचंड धूळ उडते. रस्त्याच्या दुतर्फा हॉस्पिटल, निवासी भागही असल्याने या धुळीचा रुग्णांना व रहिवाशांना प्रचंड त्रास होतो. मनपा प्रशासन मात्र याबाबत कमालीचे उदासीन व ढीम्म आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.