Take a fresh look at your lifestyle.

किरण सानप हिच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी:विश्वनाथ सोनुने

0

लोणार.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील शिवाजी नगर येथे राहत असलेल्या किरण सानप या युवतीचा एकटे पणाचा फायदा घेऊन आरोपी रईस इब्राहिम शेख या व्यक्तीने लव जिहाद प्रकरण करून तिच्यावर बलत्कार करून हत्या केली आहे.दिनांक 28 डिसेंबर रोजी किरण सानप या युवती चा मुर्तदेह तिच्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळला.हे प्रकरण जणू घडलेच नाही असे सर्व जन वागू लागले.सिन्नर पोलिसांनी या प्रकरणाची दफ्तरी नोंद केली नाही.

मुळात ही आत्महत्या संशयापद असून लव जिहाद प्रकरण आहे.आरोपी रईस ईब्रहिम शेख किरण सानप हिच्या घरी नेहमी भेटायला यायचा, आजूबाजूच्या रहिवाश्यांनी टोकल्या नंतर सुद्धा तो यायचा.आरोपी तिला धमकावून तिच्यावर वारंवार बलात्कार करायचा.किरण जवळ असलेल्या पैशाचा ही आरोपी उपभोग घ्यायचा.किरण वर वारंवार बलात्कार केल्यामुळे तिला दिवस गेले होते.तिची हत्या झाली त्यावेळेस ती तिन ते चार महिन्यांची गर्भवती होती.अचानक 30 डिसेंबर रोजी तिच्या आत्महत्येची बातमी पसरली व आरोपी कोण हे सर्वांच्या लक्षात येत असताना आरोपीची चौकशी देखील झाली नाही.किरण ही वंजारी समाजाची असल्यामुळे आरोपी हा मुस्लिम आहे,त्याने आजपर्यंत असेच उद्योग केले आहे. या घटने मुळे वंजारी समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.आरोपीवर वर इंडियन पिनल कोड च्या सेक्शन 376 व 302 अंतर्गत बलात्कार व हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा व आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत पोलिसांनी पाठपुरावा करावा या मागणीचे निवेदन राज्याचे गृहमंत्री मा.दिलीप वळसे पाटील साहेब यांना लोणार तहसिलदार साहेब यांच्या मार्फत पाठवण्यात आले आहे.हे निवेदन विश्वनाथ सोनुने वंजारी सेवा संघ लोणार तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वात देण्यात आले.सोबत संदीप शिंदे नेते राष्ट्रवादी लोणार तालुका,उध्दव नागरे,अभिषेक कायंदे ,वैभव मोरे,संतोष शिंदे, अक्षय शिंदे या वेळेस उपस्थित होते.

 


[cardoza_facebook_like_box]

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.