Take a fresh look at your lifestyle.

नवदाम्पत्याचा निसर्ग कार्यात स्तुत्य उपक्रम

शेगाव येथील नवदांपत्य चि. शुभम अशोकराव थोरात व चि.सौ.का. अश्विनी नंदकिशोर बाजारे यांचा शुभविवाह दि.९/०५/२०२३ रोजी इंदिरा गांधी विद्यालय बावनबीर येथे संपन्न झाला.

0

 शेगाव :        शेगाव येथील नवदांपत्य चि. शुभम अशोकराव थोरात व चि.सौ.का. अश्विनी नंदकिशोर बाजारे यांचा शुभविवाह दि.९/०५/२०२३ रोजी इंदिरा गांधी विद्यालय बावनबीर येथे संपन्न झाला.

आज-काल विवाह समारंभ म्हटला की वेगवेगळे थाटपाट, हौस-मौज ह्या बाबी नित्यनेमाच्या परंतु ह्या दांपत्याने साध्या पद्धतीने विवाह करून विवाहप्रसंगी प्राप्त झालेला संपूर्ण खाऊ ची रक्कम आज दिनांक १४/०५/२०२३ रोजी शेगाव शहरांमध्ये वृक्षारोपण वृक्ष संवर्धन तथा पर्यावरण पूरक उपक्रम राबविणाऱ्या गो ग्रीन फाउंडेशन ला निसर्ग कार्यासाठी हस्तांतरित केली, त्यावेळी गो ग्रीन फाउंडेशन चे सर्व सदस्य न्याय वन परिसरात उपस्थित होते गो ग्रीन च्या वतीने नवदांपत्याला वृक्ष भेट देऊन आशीर्वाद रुपी स्वागत केले तसेच भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व त्याचे न्यायालय परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले शुभम व अश्विनी यांनी घेतलेल्या निर्णयाचे संपूर्ण शेगाव परिसरामध्ये कौतुक होत आहे तसेच इतरांनी सुद्धा ह्या दांपत्यापासून प्रेरणा घ्यावी व सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवावा….

Leave A Reply

Your email address will not be published.