शेगांव तालुक्यातील टाकळी विरो येथील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ
मैनाबाई आंग्रे विद्यालय टाकळी विरो विद्यालयातील ३६ विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण संपन्न
शेगांव
प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत असलेल्या टाकळी विरो येथील शालेय विद्यार्थ्यांच्या करोना प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ दि.६ सप्टेंबर रोजी करण्यात आला.

जिल्हयातील सर्व शाळेतील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थी व विद्यार्थीनीचे १०० टक्के कोव्हीड लसीकरण करण्याबाबत शासन स्तरावरून निर्देशित करण्यात आलेले आहे त्यानुसार विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगावच्यावतीने विद्यार्थ्यांना कोव्हिड प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्याचे कार्य जोमात सुरू आहे.मैनाबाई आंग्रे विद्यालय टाकळी विरो शाळेतील वैद्यकीय अधिकारी डाॅ.तृप्ती लखोटिया यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीचे शालेय १३ विद्यार्थी व २३ विद्यार्थीनी असे एकूण ३६ विद्यार्थ्याचे लसीकरण करण्यात आले आहे.
सदर लसीकरण शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य सेवक रमेश निखाडे,एस.बी.सरोदे,श्रीमती यु.बी.मुंढे,परिचारक चंदाबाई तायडे,अंगणवाडी सेविका काळेमॅडम,ताथोडमॅडम,शाळेचे मुख्याध्यापक चव्हाणसर,नळकांडेसर,ईश्वरकरसर,उन्हाळेसर, झांबरेसर ,गवळीसर, काळेमॅडम, ब्राम्हणी,सावटेकरसर आदिनी अथक परिश्रम घेतले.
