पंचायत समिती शेगांवचे गटविकास अधिकारी यांच्या संकल्पनेतून साकारले कर्मचा-यांसाठी वाचनालय
लोप पावत चाललेली वाचन संस्कृती जोपासण्याचा वाचनालयाची उभारणी
शेगांव :
पंचायत समिती शेगाय कार्यालयात आझादी का अमृत महोत्सव व सुंदर माझे कार्यालय अंतर्गत लोकवर्गणीतुन वाचनालयाची इमारत व अद्यावत पुस्तकासह गटविकास अधिकारी सतिष देशमुख यांच्या संकल्पनेतून लोप पावत चाललेली वाचन संस्कृती जोपासणे,सांस्कृतिक शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकास घडवुन आणणे, स्पर्धा परिक्षा क्षेत्रामध्ये उत्तुंग ध्येय गाठणे या उदात्त हेतूने वाचनालय उभारण्यात आलेले आहे,अश्या प्रकारचे हे सदर वाचनालय महाराष्ट्र राज्यात दुस-या क्रमांचे असल्यामुळे गटविकास अधिकारी यांचे सर्व सामाजिक स्तरातुन कौतुक होत आहे.
वाचनालयची इमारत व वाचनालयाचे उदघाटन सोहळ्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन,दीपप्रज्वलन, शिलान्यासचे उद्घाटन सभापती सौ. शारदाताई निळकंठ लांजुळकर व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटनाची रिबिन फित कापून करण्यात आले.

सदर उद्घाटन सोहळा उपसभापती सौ.शालीनीताई सुखदेव सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ भोजने,सौ.स्वातीताई राजेंद्र देवचे,सौ.उषाताई पांडुरंग सावरकर, पंचायत समिती सदस्य विठ्ठलभाऊ पाटील, इनायतभाऊ खान,विलासभाऊ सोनटक्के,सौ.स्वातीताई अनंता शेजोळे,माजी जि.प.सदस्य पांडुरंगभाऊ शेजोळे,तहसीलदार समाधान सोनवणे,गटविकास अधिकारी सतिष देशमुख,सहाय्यक गटविकास अधिकारी,बी.डब्ल्यु.चव्हाण,तालुका आरोग्य अधिकारी घोंगटे गटशिक्षणाधिकारी एन.डी..खरात,बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती धनोकार,पशुधन विकास अधिकारी भोपळे व पंचायत समिती अंतर्गत म.रा.प्रा.शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष दादाराव भारंबे, प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल घावट,शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद इंगळे,कास्ट्राईब शिक्षक संघटने तालुकाध्यक्ष श्रीकांत झनके,अंनतराव वानखडे तसेच पंचायत समिती कर्मचारी संघटना,आरोग्य कर्मचारी संघटना,ग्रामसेवक कर्मचारी संघटना व सर्व संघटनाचे अध्यक्ष व पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक राजु इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन कृषी अधिकारी पी.एन देशमुख यांनी केले.