Take a fresh look at your lifestyle.

या धातूपासून बनवलीय मेट्रो रेल्वे, देशातील पहिलाच प्रयोग, हे शहर ठरणार लाभार्थी

या धातूपासून बनवलीय मेट्रो रेल्वे, देशातील पहिलाच प्रयोग, हे शहर ठरणार लाभार्थी

0

पुणे : शहरातील मेट्रो मार्गासाठी कलकत्ता येथील टिटागड जागं लिमिटेड कंपनीमधून पहिली मेट्रो गाडी पुण्यासाठी रवाना करण्यात आलीय. ऍल्युमिनिअम धातूचा उपयोग करून उत्पादित करण्यात आलेली देशातील ही पहिली गाडी आहे.

 पुणेमेट्रोने अशा एकूण एकशे दोन डबे असलेली 34 गाड्यांची मागणी महा मेट्रो कंपनीकडे केली होती. त्यातील पहिली गाडी पुण्याकडे रवाना करण्यात आली. केंद्रीय गृहनिर्माण खात्याचे सचिव व महा मेट्रो कंपनीचे अध्यक्ष मनोज जोशी यांच्या हस्ते या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर ब्रिजेश दीक्षित, केंद्रीय नगर विकास मंत्रालयाचे सचिव जयदीप उपस्थित होते.

लवकरच ही ट्रेन मालमोटारमधून बाय रोड पुण्यात पोहोचेल. अशा प्रकारच्या मेट्रोची निर्मिती करणे हे आव्हानात्मक काम होते. ते यशस्वीपणे पूर्ण झाले ही अभिमानाची गोष्ट असल्याचे महा मेट्रो कंपनीचे अध्यक्ष मनोज जोशी यांनी सांगितले.

या गाडीचे सर्व सुटे भाग देशात उत्पादित झाले आहे. प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही आहेत. यात पॅनिक बटन असून आपत्कालीन स्थितीत थेट मेट्रो चालकासोबत प्रवासी संवाद साधू शकतात हे या गाडीचे विशेष वैशिष्ठ आहे.

या गाडीची अन्य वैशिष्ठये :-

– नेहमीच्या मेट्रोपेक्षा वजन 6.5% कमी
– प्रत्येक गाडीला तीन डबे
– एक पूर्ण डबा महिलांसाठी राखीव
– एका डब्याची लांबी 29 मीटर
– प्रत्येक डब्याची प्रवासी क्षमता 320
– एकूण ट्रेनची आसनक्षमता 960
– गाडीचा वेग ताशी 90 किलोमीटर

Leave A Reply

Your email address will not be published.