महात्मा फुले जयंती जि.प.शाळा कठोरा येथे उत्साहात साजरी
शेगांव :
पंचायत समिती अंतर्गत असलेली जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा कठोरा येथे महात्मा जोतिबा फुले यांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला उपसरपंच नरेंद्र वावरे यांच्ये हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट, शिक्षक सुरेश डोसे,संजय महाले,सचिन वडाळ,सचिन गावंडे,अर्जुन गिरी व शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती सांगीतली.
याप्रसंगी शालेय पोषण आहार कर्मचारी कविता गवळी व शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसुर्य म.ज्योतीबा फुले यांना पुष्प अर्पण करून शाळेतील मुलींनी केले विनम्र अभिवादन