प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांचा वाढदिवस जिल्हयाभरातील शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात साजरा
शेगांव :
दिव्यांगाकरिता आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकर्षाने व धडाडीने कार्य करणारी प्रहार संघटना असुन तालुक्यातील जवळा गावानजीक असलेल्या श्री.गजानन महाराज मतीमंद विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोड पदार्थाचे वाटप करण्यात आले व शाळेतील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन शाळेकरिता प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते टाॅर्च ही भेटवस्तू म्हणून देण्यात आली.
शिक्षक राज इंगळे याचा सुपुत्र विकर्तन इंगळे ७२० पैकी ६४३ गुण,जयवंतराव वानखडे यांच्या सुकन्येने ५५४ गुण व गणेश राठोड यांची सुकन्या पलक राठोड या विद्यार्थीनीने ६३९ गुण नीट परीक्षेत प्राप्त करून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांनी पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरवून सदर विद्यार्थ्यांचा सन्मान केला आहे.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष सुनिल घावट, विजय टापरे,प्रशांत नागे,सचिन वडाळ,श्रीकृष्ण न्याहाटकर,रजनी धारपवार, किशोर मोरे,विक्रम फुसे,सारोळकर दाम्पत्य,पवार,उगले,वर्षाताई इंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पलक राठोड या विद्यार्थींनी नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतांना जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे,प्रहार संघटनेचे पदाधिकारी