Take a fresh look at your lifestyle.

शिक्षकांच्या बाल लैंगिक शोषण प्रतिबंध प्रशिक्षणामध्ये बदल करा

प्रहार शिक्षक संघटनेची गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनामार्फत मागणी

0

शेगांव :  बाल लैंगिक शोषण प्रतिबंध व वैयक्तिक सुरक्षा शिक्षण कार्यक्रमासाठी शिक्षकांचे सक्षमीकरण करण्यासाठी केंद्रप्रमुख ,मुख्याध्यापक व शिक्षकांचे प्रशिक्षण दि.२१ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात होते.
सदर कालावधीच्या दरम्यान दि.२३ फेब्रुवारी रोजी संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शाळांना स्थानिक सुटी घोषित करण्यात आलेली असल्यामुळे सदर दिवसाचे प्रशिक्षण पुढे ढकलून लगतच्या अन्य दिवशी आयोजित करण्यात यावे अशी मागणी जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल घावट,कार्याध्यक्ष सचिन वडाळ यांनी केली.
सदर विषयावर गटशिक्षणाधिकारी एन.डी.खरात यांच्याशी चर्चा केली असता संघटनेची मागणी मान्य करून सदर दिवसाच्या प्रशिक्षणाकरिता आदेशित करण्यात आलेल्या शिक्षकांचे प्रशिक्षण लगतच्या अन्य दिवशी घेण्याचे आश्वासन याप्रसंगी देऊन तात्काळ सुधारित आदेश काढण्यात आले आहे.
सदर निवेदनावर प्रहार शिक्षक संघटनेचे केंद्रसमन्वयक सचिन गावंडे,सदस्य अर्जुन गिरी व आदीच्या स्वाक्ष-या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.