Take a fresh look at your lifestyle.

शेगाव संस्थानाचे मैनेजमेन्ट गुरु शिवशंकरभाऊ पाटील.. बाबांच्या गर्दीतील भाऊ

माणसामधला देवमाणूस

0

माणसामधला देवमाणूस कर्मयोगी शिवशंकरजी पाटील शेगांव संस्थानचे प्रमुख आणि निःस्वार्थीपणे श्रध्दापूर्वक काम करणारे शिवशंकरभाऊ – शिवशंकरभाऊ म्हणजेच माणसामधला देवमाणूस आहे. त्यांना भेटल्याशिवाय ते कळणार नाही. श्री गजानन महाराज संस्थानचा भव्यपणा तिथली टापटिप व्यवस्था आणि निष्ठेने काम करणार्याची तनमयता तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. त्या मंदिरात सेवा करण्यासाठी हजारो प्रतिक्षा यादी आहे. भाऊंची ही कमाल आहे तीन हजार सेवेकरी त्या मंदिराच्या परिसरात तुम्हाला ते सगळे श्रध्देने काम करणारे आहेत. भाऊंनी हे परिवर्तन घडविले. संस्थानच्या कारभाराची सुत्रे भाऊंच्या हातात येण्यापुर्वी या संस्थानची वार्षिक उलाढाल पंचेचाळीस लाख रुपयांची होती. भाऊंनी ही उलाढाल आता १३७ कोटी रुपयापर्यंत आणली त्यातूनच महाराष्ट्रातले सर्वात्कृष्ठ इंजिनिअरिंग कॉलेज तिथे उभे राहिले. त्यातूनच आनंदसागर सारखे जागतिक किर्तीचा नंदनवन ठरेल, असा भव्य बगिचा उभा राहिला.

शब्दामध्ये वर्णन न करता येण्यासारखा काही विषय सांगून समजत नाही . ते प्रत्यक्ष पाहावे लागतात ऐकण्याचा आनंद वेगळाच. शिवशंकरभाऊ कोणालाही मुलाखत देत नाही. प्रसिद्धी त्यांना नको आहे. शरद पवारांसारखे जेष्ठ नेते भाऊंना माणतात. मला असे वाटते की, शरद पवार एकाच व्यक्तीला वाकुन नमस्कार करतात ते म्हणजे आमचे शिवशंकरभाऊ. अमेरिकेतल्या सिटी बॅंकेचे विक्रम पंडित हे गजानन महाराजांचे भक्त ते नेहमीच येतात.

भाऊंचे काम पाहून ते असे थक्क झाले की त्यांनी भाऊंना सांगितले या सगळ्या प्रकल्पासाठी किती कोटी हवे तेवढे सांगा विक्रम पंडितांनी त्यांच्या बॅंकेमार्फत किती कोटी द्यावेत ? तब्बल ७०० कोटी, कोण येवढे पैसे देईल, देणार्याची दानत मोठी असेल, पण घेण्याराचा प्रामाणिकपणा आणि सचोटी माहीत असल्याशिवाय ऐवढी प्रचंड रक्कम कोणती बॅंक देऊ शकेल ? लिखापढी नाही, जमीन नाही , कोणती मालमत्ता बॅंकेकडे गहान नाही, आणि एक भक्त आपल्या बॅंकेचा ऐवढा प्रचंड पैसा भाऊंच्या विश्वासावर देतो.

विक्रम पंडितांनी ७०० कोटी रुपये दिले. आमच्या विश्वस्त मंडळाने आराखडा तयार केला की किती पैसे लागतील याचा हिशोब केला किती पैसे परत फेडू शकू ते गणीत बसवले आणि अस ठरवलं की ७०० कोटी आपल्याला नकोत फक्त ७० कोटी रुपये घ्यायचे महाराजांचा असा संदेश असायचा की गरजे पुरते घ्या आणि जे घ्याल ते परत करा. आम्ही विचार केला गरज ऎवढीच आहे . आणि फक्त ७० कोटी घेतले त्यांची परतफेड केली. गजानन महाराज यांच्या प्रेमापोटी विक्रम पंडितांनी ही रक्कम दिली, त्याचा विनियोग कुठेही चुकीचा होणार नाही, याची काळजी घेतली आणि म्हणूनच त्यांचा विश्वास बसला.

भाऊ म्हणाले मी कोणालाही मुलाखत देत नाही पद्मश्री, पद्मभूषण काही घेत नाही, शरद पवार म्हणाले मी शिफारस करतो भाऊ म्हणाले अजिबात नको आणि शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे पण भाऊंना भेटायला आल्या होत्या त्यांनी काम पाहिले आणि थक्क झाल्या आनंदसागर बघून आल्या, इंजिनिअरिंग कॉलेज पाहिलं , सगळे प्रकल्प पाहिले अत्यंत प्रसन्न होऊन म्हणाल्या, भाऊ तुम्हाला तर भारतरत्न दिले पाहिजे , भाऊ म्हणाले मला कशाला ज्यांना भारतरत्न मिळाली त्यातही काही मंडळी साबणाच्या जाहिराती करत आहात, अहो काय भावनेने तुम्हाला ऐवढा मोठा सम्मान दिला आणि तुम्ही काय करीत आहात ? मला कशाचीही हाव नाही, महाराजांनी सेवा करायला सांगीतली न बोलता सेवा करायची, मी संस्थानचे पाणी , चहा घेत नाही घरून पाणी घेऊन येतो. ही महाराजांची शिकवण आहे ,आपण देण्यासाठी आहोत घेण्यासाठी नाही, त्यामुळे कसला लोभ नाही, आपण चेतन आहोत, कशाचा लोभ करायला हवा ? पैशाने माणसाची कधी किंमत होत नाही आणि तशी वस्तूने पण होत नाही, माणसाला नाचवणारी माया आहे, आणि मायेला नाचवणारी भक्ती आहे श्रध्दा आहेत, आम्ही माया स्वीकारत नाही, आम्ही श्रध्दा स्वीकारतो ते सुत्र आम्ही पाळले.

 

विक्रम पंडितांनी जेंव्हा ७०० कोटी रुपये देऊ केले तेव्हा त्यांना हे सांगितले जेवढे लागतील तेवढे घेऊ ७० कोटी घेतले, त्यांनी पण जाहिरात केली नाही, आणि आम्हीही जाहिरात केली नाही हा भक्तीचा व्यवहार आहे. लोक मला सांगत आहे भाऊ, आनंदसागर पाहण्याची फी ३०० रुपये करा लोक आनंदाने देतील , मी सांगितले नाही, अशा पध्दतीने पैसा मिळवायचा नाही आणि मिळाला तरी टिकायचा नाही आम्ही १५ रुपये ठेवली. आज १३७ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहेत. त्यात १३ टक्के पैसे मानवसेवेवर खर्च करतो रुग्णालये आहेत , औषधे आहेत १० टक्के रक्कम बाजुला काढुन नवीन बांधकामासाठी ठेवतो.

भक्त निवास कशी बांधली आहेत बघा बाबा आमटे कुठेच जाऊन राहत नव्हते ते फक्त इथेच यायचे देऊळातही जात नाही म्हणायचे आपला उद्देश स्वच्छ असेल तर लोकांना तो समजतो, काम श्रध्देने करा आणि प्रामाणिकपणे करा

४२ प्रकल्पांतून अहोरात्र सुरू आहे मानवाची सेवा

शेगावच्या गजानन महाराज संस्थानमध्ये केवळ दर्शनासाठीच हजारोंची रांग लागते असे नव्हे, तर या संस्थानमार्फत शिवशंकरभाऊंनी जे
४२ प्रकल्प उभे केले आहेत, त्या प्रकल्पातल्या प्रत्येक  विषयाचा फायदा सामान्य माणसालाच होतो आहे,
ते हे ४२ प्रकल्प..

१) धर्मार्थ अ‍ॅलोपॅथी दवाखाना, २) धर्मार्थ होमिओपॅथी दवाखाना, ३) धर्मार्थ आयुर्वेदिक दवाखाना, ४) अपंग पुनर्वसन केंद्र, ५) फिरते रुग्णालय (मोबाईल व्हॅन), ६) फिरते रुग्णालय (मोबाईल व्हॅन आदिवासी विभागाकरिता),
७) नेत्रशस्त्रक्रिया शिबिर, ८) प्राथमिक स्वास्थ्य केंद्र नसलेल्या परिसरातील ग्रामीण विभागातील रुग्णाकरिता फिरती रुग्णालय सेवा, ९) ग्रामीण विभागांतील कमकुवत घटकातील रुग्णांना आर्थिक मदत,
१०) फिजिओथेरपी विभाग, ११) श्रीक्षेत्र पंढरपूर, श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर (कुंभमेळा) तसेच मध्य प्रदेशातील श्रीक्षेत्र ओंकारेश्वर (कार्तिक मेळा) येथे यात्रेकरूंच्या सुविधेकरिता मोफत औषधोपचार केंद्र तथा महाप्रसाद वितरण, १२) वेगवेगळ्या गंभीर आजाराने पीडित रुग्णांकरिता विशेष मार्गदर्शन शिबिरे व मदत, १३) राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत वेगवेगळ्या लसीकरणाची मोहीम, १४) सातपुडा सेवा प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी सेवा प्रकल्प, १५) श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालय,
१६) आदिवासी विभाग दीपावलीला मिष्टान्नासह कपडे वितरण, १७) आदिवासींना गरजेनुसार अन्नधान्य वितरण, १८) आदिवासी मुला-मुलींच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन व संसारोपयोगी भांडी वाटप, १९) आदिवासी पाल्यांचे मार्गदर्शनार्थ पालक मेळावे, २०) बौद्धिकदृष्टय़ा कमकुवत पाल्यांच्या विकासासाठी पालक मेळावे तथा मार्गदर्शनपर शिबीर, २१) ग्रामीण सेवा, २२) विभागीय नैसर्गिक आपद्ग्रस्तांना मदत-भुकंप, पूरपीडित, दुष्काळ, आगग्रस्त (अग्निप्रकोप) प्रसंगी सर्वतोपरी सहाय्य, २३) दुष्काळग्रस्त विभागातील जनावरांकरिता चारा व पाण्याची व्यवस्था, २४) अवर्षणग्रस्त भागाकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, २५) कुष्ठरोग्यांच्या सेवेतील संस्थेस आर्थिक सहाय्य,
२६) वारकरी शिक्षण संस्था व लहान मुलांकरिता व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे, २७) प्रवचन, कीर्तन, दिंडी यात्रा व व्याख्यानाद्वारे आध्यात्मिक प्रबोधन,
२८) भजनी साहित्य वाटप टाळ, मृदंग, विणा तसेच संत वाङ्मय वितरण, शेगाव, श्रीक्षेत्र पंढरपूर व श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे (आतापावेतो ११८५६ दिंडय़ांना साहित्य वाटप), २९) संत वाङ्मय प्रचार, ३०) धार्मिक, आध्यात्मिक व योगासन शिबिर, ३१) श्रींच्या दर्शनार्थ पालखी सोहळा आयोजन, ३२) शेगांवसह संस्थेच्या सर्व अधिकृत शाखांमध्ये भक्तनिवास सेवा, ३३) दररोज ३० हजार भक्तांना मिष्टान्नासह महाप्रसादाचे विनामूल्य वितरण, ३४) अल्प देणगी भोजन सेवा, ३५) आनंदसागर प्रकल्प, राष्ट्रीय कार्ये, सर्वधर्म समभाव, मानवी मूल्यांची जोपासना, मानसिक शांती राहावी, लहान मुलांचे शारीरिक समृद्धीसाठी विविध खेळण्यांसह बालोद्यान व पुरातन तथा नूतन संस्कृतीची जोपासना अशा अनेक निधींनी नटलेला आनंदसागर, ३६) शेगांव व आजूबाजूच्या परिसरातील भूगर्भामधील पाण्याच्या पातळीचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न, ३७) पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता वृक्षारोपण २ लाखांच्या जवळपास, ३८) वाचनालय, ३९) २४ तास सेवार्थ बस सेवा उपलब्ध, ४०) ५ बसेसद्वारा मंदिर-बस स्टॅण्ड- रेल्वेस्टेशन-आनंदसागर (जाणे-येणे), ४१) लोकहितोपयोगी तसेच राष्ट्रीय हित साधण्याच्या दृष्टीने शैक्षणिक गुणवत्ता विकास, नैतिक विकास व संपूर्ण स्वच्छता अशा कार्यशाळेकरिता कार्य, ४२) खातेनिहाय कामाद्वारे रोजगार उपलब्ध.

जय श्री गजानन


[cardoza_facebook_like_box]

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.