Take a fresh look at your lifestyle.

जिल्ह्यात बरेच निर्बंध शिथील, काही कायम

- किराणा, भाजीपाला,फळे, खाद्याची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत खुली राहणार

0

बुलडाणा,
राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यात 1 जून रोजी सकाळी 7 वाजेपासून ते 15 जून रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. तसेच मुख्य सचिव यांच्या 4 जून च्या आदेशानुसार जिल्ह्यातील पॉझीटिव्हीटी रेट, ऑक्सिजन बेडची उपलब्धता तसेच दैनंदिन आढळणार्‍या रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता सुधारित सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत. सदर श्रेणी नुसार जिल्हा श्रेणी 3 मध्ये समाविष्ट आहे. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती त्यांनी 7 जून रोजी सकाळी 7 वाजेपासून ते पुढील आदेशापर्यंत निबंधासह सुट देण्यात आलेल्या सेवांबाबत प्रतिबंधात्मक आदेश पारित केले आहे.

आदेशानुसार सर्व किराणा दुकाने, स्वस्त धान्य दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, मिठाई दुकाने, खाद्य पेय विक्री दुकाने, पिठाची गिरणी, तसेच सर्व प्रकारची खाद्य पदार्थाची दुकाने (चिकन,मटन,पॉल्ट्री,मासे आणि अंडी दुकाने), पाळीव प्राणी खाद्य पदार्थांची दुकाने, तसेच दुध व दुग्धजन्य विक्री पदार्थ (डेअरी) आदी दुकाने,कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठांची दुकाने, कृषि प्रक्रिया, उद्योग गृहे, शेती अवजारे व शेतातील उत्पादनाशी निगडीत दुकाने, 50 टक्के आसन क्षमतेसह शिव भोजन केंद्र, दररोज सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. सर्व प्रकारची बिगर जीवनावश्यक सेवा अंतर्गत येत असलेली दुकाने, प्रतिष्ठाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. ही दुकाने शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील. मॉल्स, चित्रपटगृहे पूर्णतः बंद राहतील.

हॉटेल्स, रेस्टॉरंट व खानावळ 50 टक्के आसन क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवार तसेच अन्य दिवशी दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत केवळ घरपोच सेवेला परवानगी राहील. सार्वजनिक ठिकाणे, खुले मैदान, फिरणे व सायकलिंग साठी सकाळी 5 ते सकाळी 9 पर्यंत परवानगी असेल. सर्व प्रकारची खाजगी कार्यालये दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये एकूण उपस्थिती क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेसह सुरू राहतील. दररोज सकाळी 5 ते सकाळी 9 पर्यंत खेळांना परवनगी असेल. सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रम स्थानिक प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीने व 50 टक्के क्षमतेसह घेण्यास परवानगी असेल. असे कार्यक्रम शनिवार व रविवार बंद असतील. आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती,संस्था,संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधीत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिका-यास या आदेशाद्वारे पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात येत आहे.

 

 


[cardoza_facebook_like_box]

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.