Take a fresh look at your lifestyle.

बलात्कारातून सावरली पण मानहानी सहन होईना; १५ वर्षीय मुलीने आपल्याच ४० दिवसाच्या बाळाचा गळा दाबला अन…

पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून तरुणीला बालसुधारगृहात पाठवलं आहे

0

बलात्कारानंतर होणारा अपमान सहन होत नसल्याने अल्पवयीन मुलीने टोकाचं पाऊल उचलल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील दामोह जिल्ह्यातील या बलात्कार पीडित तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तरुणीने आपल्याच ४० दिवसांच्या बाळाची हत्या केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

बलात्कारानंतर पीडित तरुणीने बाळाला जन्म दिला होता. वारंवार होणाऱ्या अपमानामुळे तरुणीने हे टोकाचं पाऊल उचललं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. “मुलीचे त्यांच्याच गावातील एका १७ वर्षाच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. फेब्रुवारी महिन्यात मुलाने बलात्कार केल्यानंतर ती गरोदर राहिली होती. मुलीने ऑगस्ट महिन्यात पोट दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर कुटुंबीयांना याची माहिती मिळाली. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनीच त्यांना याबद्दल सांगितलं, नंतर मुलीने सगळी आपबीती कुटुंबाला सांगितली,” असं पोलिसांनी सांगितलं आहे.

मुलीच्या कुटुंबाने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतर त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं होतं.

यादरम्यान मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे तरुणीने १६ ऑक्टोबरला बाळाला जन्म दिला. ५ नोव्हेंबरला तिला रुग्णालयातून सोडण्यात आलं.

दरम्यान तरुणीने आपल्या बाळाची हत्या केल्यानंतर एका स्थानिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. आपलं बाळ आजारी असल्याचं तिने खोटं सांगितलं. पण बाळाला आणण्यात आलं तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन केलं असता गळा दाबल्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. यानंतर तरुणीने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून तिला बालसुधारगृहात पाठवलं आहे.

 


[cardoza_facebook_like_box]

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.